dr shriram lagoo will get state of honour Funeral on 20th december 
पुणे

डॉ. श्रीराम लागू यांच्यावर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; 11 वाजता निघणार अंत्ययात्रा

सकाळ डिजिटल टीम

पुणे : ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्यावर शुक्रवारी (ता. 20) शासकीय इतमामांत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबत राज्य सरकारने जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्‍त यांना निर्देश दिले आहेत. राज्य सरकारच्या वतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई हे सकाळी सव्वाअकरा वाजता डॉ. लागू यांच्या अंत्यविधीस वैकुंठ स्मशानभूमी येथे उपस्थित राहणार आहेत.

उद्या सकाळी ९ वाजता डॉ. श्रीराम लागू पार्थिव रुग्णालयातील शवागृहातून कर्वेनगर येथील राहत्या घरी नेण्यात येणार असून त्याठिकाणी  फक्त नातेवाईकांना पाऊण तास अंतिम दर्शन घेता येणार आहे. सकाळी १० वाजता डॉ. लागू यांचे पार्थिव बालगंधर्व रंगमंदिरात ठेवले जाणार असून, एक तास सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे अंतिम दर्शन घेता येणार आहे. सकाळी ११ वाजता डॉ. लागू यांची अंत्ययात्रा बालगंधर्वपासून निघणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता पोलिसांकडून त्यांना मानवंदना दिली जाणार आहे. साधारणपणे दुपारी सव्वा बाराच्या सुमारास डॉ. लागू यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. पोलीस उपायुक्त मितेश घट्टे राजशिष्टाचार अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. 

वाचा श्रीराम लागू यांच्याविषयी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT