Dr. Shriram Lagoos Hindi and Marathi movies and Marathi Plays
पुणे : नाटक आणि सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेले ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं आज (ता. १७) पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. सूर्य पाहिलेला माणूस, नटसम्राट यांसारखी नाटकं असतील किंवा पिंजरा अजरामर सिनेमा असेल, डॉ. लागू यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेला सर्वोत्तमरित्या सादर केलं. यासह हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं. त्यांनी केलेले चित्रपट मालिका आणि नाटकं यांची माहिती खालीलप्रमाणे आहे.
डॉ. श्रीराम लागू यांचे पुण्यात निधन
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
डॉ. श्रीराम लागू यांनी भूमिका साकारलेल्या मालिका आणि चित्रपट
- अग्निपंख (रावसाहेब)
- अँटिगनी (क्रेयाँ)
- आकाश पेलताना (दाजीसाहेब)
- आत्मकथा (राजाध्यक्ष)
- आंधळ्यांची शाळा (आण्णासाहेब, विश्वनाथ)
- आधे अधुरे (एकूण ४ भूमिका केल्या)
- इथे ओशाळला मृत्यू (संभाजी)
- उद्याचा संसार (विश्राम)
- उध्वस्त धर्मशाळा (श्रीधर)
- एकच प्याला (सुधाकर)
- एक होती राणी (जनरल भंडारी)
- कन्यादान (नाथ देवळालीकर)
- कस्तुरीमृग (रावबहादुर पेंडसे)
- काचेचा चंद्र (बाबुराव)
- किरवंत (सिद्धेश्वरशास्त्री)
- खून पहावा करून (आप्पा)
- गार्बो (पॅन्सी)
- गिधाडे (रमाकांत)
- गुरु महाराज गुरू (गुरुनाथ)
- चंद्र आहे साक्षीला
- चाणक्य विष्णुगुप्त (चाणक्य)
- जगन्नाथाचा रथ (भुजबळ, सखा)
- डॉक्टर हुद्दार (हुद्दार)
- दुभंग
- दूरचे दिवे (सदानंद)
- देवांचे मनोराज्य (विष्णू)
- नटसम्राट (बेलवलकर)
- पप्पा सांगा कुणाचे (पप्पा)
- पुण्यप्रभाव (वृंदावन)
- प्रतिमा (चर्मकार)
- प्रेमाची गोष्ट (के. बी.)
- बहुरूपी
- बेबंदशाही (संभाजी)
- मादी
- मित्र
- मी जिंकलो मी हरलो (माधव)
- मुख्यमंत्री (मुख्यमंत्री)
- यशोदा (अण्णा खोत)
- राजमुकुट (राजेश्वर)
- राव जगदेव मार्तंड (जगदेव)
- लग्नाची बेडी (कांचन)
- वंदे मातरम् (त्रिभुवन)
- वेड्याचं घर उन्हात (दादासाहेब)
- शतखंड (प्रा. धुंडिराज धांदेफळकर)
- सुंदर मी होणार (डॉ. पटवर्धन)
- सूर्य पाहिलेला माणूस (सॉक्रेटीस)
- हिमालयाची सावली (गुंडो गणेश)
- क्षितिजापर्यंत समुद्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.