Pune Municipal Sakal
पुणे

पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा निवडणूक आयोगाला सादर

पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रशासनाने तयार करून निवडणूक आयोगाला सादर केला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रशासनाने तयार करून निवडणूक आयोगाला सादर केला. त्यानंतर आता हा आराखडा नियमानुसार झाला आहे की नाही? चारचा प्रभाग असताना तीनचा प्रभाग व्यवस्थित केले आहे का? यासह इतर कायदेशीरबाबी तपासण्यासाठी सोमवारी (ता. १३) निवडणूक आयोगासमोर सादरीकरण केले जाणार आहे. या सादरीकरणामुळे प्रारूप आराखडा नागरिकांसाठी खुला करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडणार आहे.

पुणे महापालिकेची २०२२ ची निवडणूक ही तीन सदस्यांचा प्रभाग पद्धतीने होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने महापालिकेला प्रारूप प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले होते. हे काम ३० नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होऊ शकणार नसल्याने ६ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. प्रारूप आराखडा तयार करताना आपल्या मनाप्रमाणे व पक्षाला फायदा होईल या पद्धतीने प्रभाग रचना करावी यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी तर थेट आयुक्तांच्या बंगल्यावर धाव घेऊन प्रभाग रचनेत बदल करावी अशी गळ घातली होती. ही प्रभाग रचना करताना मध्यवस्तीतील दोन प्रभाग कमी झाले आहेत. तसेच महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या मातब्बर नगरसेवकांचे प्रभाग सुरक्षीत असल्याचीही चर्चा महापालिकेत रंगली आहे.

प्रारूप आराखडा आयोगाला सादर केल्यापासून आता प्रभाग रचना कधी जाहीर होणार याची उत्सुकता लागली आहे. महापालिकेने सादर केलेल्या प्रारूप रचना तपासण्यासाठी सोमवारी सादरीकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांना मुंबईला बोलविण्यात आले आहे. हे सादरीकरण करताना प्रभागात लोकसंख्या योग्य प्रमाणात आहे का?, नैसर्गिक प्रवाह, रस्ते, उड्डाणपूल सीमा मानून रचना केली आहे का ?, तसेच एक सोसायटी, वस्ती, गाव एकाच प्रभागात आले आहे की ते तोडून विभागणी केली आहे यादीची तपासणी केली जाईल. आवश्यक ते बदल आयोगाकडून पालिकेला सुचविले जातील, त्यानंतर काही दिवसांनी प्रारूप प्रभाग रचना नागरिकांच्या हरकती सूचनांसाठी जाहीर केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT