पुणे

दुष्काळी अक्कलकोटमध्ये ‘लाल सोन्याची’ शेती; ड्रॅगन फ्रुटने शेतकऱ्यांना दिली नवी उभारी

CD

JEU26B08180, JEU26B08178
बोरोटी (ता. अक्कलकोट) नीरज जाधव यांच्या शेतातील ड्रॅगन फ्रूटचे पीक.

दुष्काळी अक्कलकोटमध्ये ड्रॅगन फ्रुट शेतीची नवी दिशा
बोरोटी (बु.) येथील नीरज जाधव यांची साडेआठ एकर बाग; पुणे, सोलापूर बाजारपेठेत मागणी

अक्कलकोट, ता. ५ : कमी पाऊस, पाण्याची टंचाई आणि पारंपरिक पिकांमधील घटते उत्पन्न, यामुळे चिंतेत असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ड्रॅगन फ्रुट शेती आशेचा किरण ठरत आहे. बोरोटी (बु.) येथील प्रगतशील शेतकरी नीरज जाधव यांनी साडेआठ एकरांवर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली असून, त्यांच्या बागेतील उत्पादनाला पुणे आणि सोलापूर या प्रमुख बाजारपेठांत चांगली मागणी आहे.

आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनाच्या बळावर ड्रॅगन फ्रुटमधून चांगले उत्पन्न मिळत असल्याने तालुक्यातील इतर शेतकरीही या फळपिकाकडे वळत आहेत.
नीरज जाधव म्हणाले, ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी एकरी सुमारे चार लाख रुपयांचा खर्च येतो. पहिल्या वर्षी एकरी सुमारे चार टन उत्पादन मिळते, तर तीन वर्षांनंतर ते दहा टनांपर्यंत वाढण्याची अपेक्षा असते. एकदा लागवड केलेली बाग सुमारे २० ते २५ वर्षे उत्पादन देत असल्याने हे दीर्घकालीन आणि खात्रीशीर उत्पन्न देणारे पीक ठरते.
ऊस, ज्वारी, तूर, हरभरा यांसारख्या पारंपरिक पिकांबरोबरच बदलत्या हवामानाचा विचार करून अनेक शेतकरी उच्च मूल्याच्या फळपिकांकडे वळत आहेत. कमी पाण्याची गरज, तुलनेने कमी देखभाल आणि सातत्यपूर्ण उत्पादन यामुळे ड्रॅगन फ्रुट शेतीला विशेष पसंती मिळत आहे.
ड्रॅगन फ्रुटला सोलापूर, पुणे, मुंबई आणि हैदराबादसह विविध शहरांमध्ये वर्षभर मागणी असल्याने उत्पादकांना समाधानकारक दर मिळत आहेत.
कृषी क्षेत्रातील जाणकारांच्या मते, भविष्यातील शेती ही पाण्याचा कार्यक्षम वापर, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेच्या अभ्यासावर आधारित असेल. त्यामुळे ड्रॅगन फ्रुटसह डाळिंब, अंजीर, सीताफळ आणि पेरू यांसारख्या उच्च मूल्याच्या फळपिकांकडे नियोजनपूर्वक वळणे आवश्यक आहे.

कोट
- पारंपरिक शेतीसोबत बाजारपेठेची गरज ओळखून आधुनिक फळपिकांचा स्वीकार केल्यास शेती अधिक फायदेशीर होऊ शकते. योग्य नियोजन, तांत्रिक मार्गदर्शन आणि गुणवत्तेवर भर दिल्यास ड्रॅगन फ्रुटसारखी पिके ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देऊ शकतात.
- नीरज जाधव, ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकरी, बोरोटी (बु.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT