पुणे

ड्रॅगन फ्रूटमुळे लक्ष्मी प्रसन्न

CD

उच्चशिक्षित सेवानिवृत्त अभियंता शांताराम नागवडे व पत्नी सुनीता यांनी मुरमाड शेतामध्ये फळबागांचे उत्पादन घेत कुटुंबाचे अर्थकारण उंचावले आहे. खामगाव (ता. दौंड) येथील नागवडे हे खामगाव परिसरातील पहिले अभियंता आहेत. खामगाव परिसरात प्रथमच अडीच एकर ड्रॅगन फ्रूट उत्पादनातून सलग तीन वर्षे घसघशीत उत्पन्न मिळविले. ड्रॅगनच्या अभिनव उपक्रमामुळे नागवडे कुटुंबाच्या घरी लक्ष्मी अवतरली आहे.
- प्रकाश शेलार, खुटबाव

बहरीन या देशातून अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर वयाच्या साठीनंतर नागवडे यांनी फळबागा करण्याचा निर्णय घेतला. २०२१ मध्ये अडीच एकर क्षेत्रामध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. ड्रॅगन फ्रूटसाठी प्रत्येकी ३५ रुपये किमतीच्या ४००० रोपांची लागवड केली. जत (जिल्हा सांगली) येथील एका खासगी शेतकऱ्याकडून ही रोपे विकत घेण्यात आली. मशागतीपूर्वी शेतीमध्ये शेणखत टाकले. मशागत करताना ट्रॅक्टरच्या साह्याने बेड तयार केले. त्यानंतर कुशल मजुरांच्या साह्याने १२ बाय ७ फूट अंतरावर ड्रॅगन फ्रूटचे प्रत्येक रोप लावले. त्याला आधार देण्यासाठी शेतात साडेचार फूट अंतरावर खांब रोवले. पिकाला ठिबक सिंचन सुविधा केली. रात्रीचा प्रकाश दिसावा म्हणून ७०० स्वयंचलित एलईडी लॅम्प शेतामध्ये लावले. यासाठी त्यांनी १ लाख २० हजार रुपये खर्च केले. या प्रकाशामुळे जेव्हा रात्र मोठी असते, तेव्हा रात्रीच्या वेळी ड्रॅगन फ्रूट वाढीसाठी फायदा होतो. वेळोवेळी औषध फवारणी, खतांची मात्रा पिकांसाठी वापरली. सर्व गोष्टी अनुकूल झाल्यामुळे जम्बो रेड आकाराचे फळ तयार झाले.
दरम्यान, ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन घेतल्याने नागवडे यांना दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीने ‘आदर्श शेतकरी पुरस्कार-२०२६’ देऊन गौरविले आहे.

बांधावरच प्रतिकिलो ११३ रुपये भाव
दरवर्षी २१ मे पासून हंगामास सुरुवात होते तर १५ नोव्हेंबरला हंगाम संपतो. पाच महिने या पिकाकडे दुर्लक्ष केले तरी चालते. एकदा लावलेल्या रोपांपासून सलग २० वर्षे हंगाम घेतला जातो. दरवर्षी उत्पन्नात वाढ होत जाते. तसेच होणाऱ्या खर्चामध्ये बचत होते. या शेतीमध्ये तयार झालेल्या एकेका लाल भडक फळाचे वजन ४०० ते ६०० ग्रॅम आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे ड्रॅगन फ्रूटला बांधावरच प्रतिकिलो ११३ रुपये बाजारभाव मिळत आहे. सध्या ड्रॅगन फ्रूटचा काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.

लागवडीसाठी साडेचार लाख रुपये खर्च
कौशल्य प्राप्त केलेल्या मजुरांकडून तोडे करण्यात येत आहेत. तयार झालेल्या मालाची अनेकदा बांधावरच विक्री केली जाते. याशिवाय तयार माल हा मार्केटयार्ड पुणे व मुंबई येथील बाजारपेठेत विक्रीसाठी जातो. पहिल्या वर्षी लागवडीसाठी सरासरी साडेचार लाख रुपये खर्च येतो. दरवर्षी हंगाम घेताना किमान दोन लाख रुपये खर्च येतो.

कुटुंब घडवले उच्चशिक्षित
शांताराम नागवडे यांचा मुलगा प्रशांत यांचे सीओईपी कॉलेजमध्ये इंजिनियरिंग झाले आहे. सध्या ते एका आयटी कंपनीमध्ये डिझाईन मॅनेजर आहेत तर मुलगी प्रणाली या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात व्याख्याती म्हणून कार्यरत आहेत. स्नुषा प्रणाली या पुण्यात असणाऱ्या एका अमेरिकन कंपनीमध्ये व्यवस्थापक आहेत. सुट्टीच्या दिवशी नागवडे परिवार एकत्रितपणे ड्रॅगन फ्रूट शेतीकडे लक्ष देतो.

शांताराम नागवडे म्हणतात...
- कोणी ड्रॅगन फ्रूट शेती करणारा असेल तर त्याला मोफत रोपे देणार
- लागवडीसाठी सर्वातोपरी मार्गदर्शनाची तयारी
- अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ड्रॅगन फ्रूट हा सर्वोत्तम पर्याय
- पारंपरिक ऊस, कांदा, गहू यापेक्षा ड्रॅगन फ्रूट शेती केल्यास उत्पन्न वाढेल.


ड्रॅगन फ्रूट फळांपासून मिळालेले उत्पादन
वर्षे ..............मिळालेले उत्पादन .............एकूण उत्पन्न
२०२३-२४............ पाच टन .............चार लाख ५० हजार रुपये
२०२४-२५ .............१७ टन .............१७ लाख रुपये
२०२५-२६ .............१८ टन .............१८ लाख रुपये.


शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीतून बाहेर पडले पाहिजे. ड्रॅगन फ्रूटचा पहिलाच पायलट प्रोजेक्ट खामगाव परिसरात राबवला. त्यास कमालीचे यश आहे. चालू वर्षी अजून अडीच एकर ड्रॅगन फ्रूट लागवड करायची आहे. याशिवाय जारवी पेरूच्या उत्पादनातून चांगले पैसे मिळाले आहेत.
- शांताराम नागवडे, ड्रॅगन फ्रूट उत्पादक

04019, 62226, 04023, 04022

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : पदवीधरांचा कौल सरकारविरोधात; धोरणांबद्दल तरुणांची नाराजी, दुष्काळी मदतीची पाच हजारांची रक्कम अपुरी

मोठी बातमी! INDIA आघाडीच्या महारॅलीला अभिजीत दीपके यांचा पाठिंबा; ‘GYANU MUST GO’ म्हणत पोस्ट, नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: ''महाराष्ट्रात आणखी २३ प्रकल्प येत आहेत.. भीमाशंकर परिसरातील वृक्षतोड टेंडरशिवाय'', राज ठाकरेंची कर्जतमध्ये सभा

MLA Harshada Deshmukh : एमपीएससीतील पारदर्शकतेसाठी प्रयत्न करणार; रोजगार, शिक्षणाच्या प्रश्नांवरही देणार भर

Raj Thackeray Karjat tree cutting visit : "गुजरातमधल्या एका कंपनीसाठी हा सारा खटाटोप!"; कर्जतच्या जंगलात स्वतः उतरताच राज ठाकरेंचा सरकारवर थेट वार, सभेत तोफ धडाडणार!

SCROLL FOR NEXT