वडगावशेरी येथील आनंद पार्क सोसायटीत ड्रेनेज कामांना सुरुवात sakal
पुणे

वडगावशेरीतील आनंद पार्क सोसायटीची ड्रेनेजची समस्या सुटली

सर्वत्र दुर्गंधी आणि डासांच्या उत्पत्तीचे आगार हे ठिकाण बनले

सुषमा पाटील.

रामवाडी : ड्रेनेज समस्याने आनंद पार्क त्रस्त या आशयाची बातमी सकाळ मध्ये (ता.16 ) प्रसिद्धी करण्यात आली होती. प्रशासनाने दहा दिवसात ड्रेनेज कामे पुर्ण केले नाही. तर पुणे महापालिकेच्या आयुक्तांच्या ऑफिस बाहेर उपोषण करणार आहे तसेच नगररोड रस्तावर आंदोलन करणार असल्याचे रहिवाशां कडून सांगण्यात आले होते. सोसायटीमध्ये पाहणी साठी आलेल्या नगररोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त सुहास जगताप यांना रहिवाशांनी घेराव घातला. या आशयाची बातमी सकाळ मध्ये ता.21 प्रसिद्धी झाल्या नंतर प्रशासन खडबडून जागे झाले असुन पुणे महानगरपालिका आयुक्तांनी कडून या कामाची दखल घेतली गेली.

आज सकाळी पोलीस बंदोबस्त मध्ये ड्रेनेज कामे सुरू करण्यात आली. सकाळ वृत्तपत्रातून आमच्या समस्या वारंवार बातम्या द्वारे तुम्ही मांडल्या यामुळे 15 वर्षापासुन ड्रेनेज समस्या सुटली. सकाळला मनापासुन आम्ही सर्व रहिवासी धन्यवाद देतो असे सोसायटीचे अध्यक्ष सुनील चूत्तर म्हणाले.

वडगावशेरी येथील आनंदपार्क सोसायटीच्या समोर ड्रेनेज पाणी साठून राहिल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. सर्वत्र दुर्गंधी आणि डासांच्या उत्पत्तीचे आगार हे ठिकाण बनले होते. तळमजल्यावरील सदनिकेत मैलायुक्त पाणी आत येत असल्याने जावे कुठे हा प्रश्न सोसायटी तील रहिवाशांना पडला होता.

आनंद पार्क सोसायटीत 132 सदनिका आहे. बाजुला महानगरपालिकेचे अण्णा हजारे उद्यान आहे. पावसाचे पाणी आणि ड्रेनेज पाणी तळ मजल्यावरील 12 सदनिकेत जाऊन सर्वत्र दुर्गंधी पसरत होती. अण्णा हजारे उद्यानाच्या प्रवेश द्वारा बाहेर साचलेल्या घाण दुर्गंध युक्त सांडपाण्यातुन उद्यानात जाण्यासाठी मुलांना स्वतः चा जीव धोक्यात घालून तारेवरची कसरत करावी जावे लागत होते. लवकरात लवकर ड्रेनेज कामे पुर्ण करावी अशी मागणी येथील रहिवासी करीत होते. अखेर ड्रेनेज कामे सुरु झाल्याने रहिवाशांनी सुटकेचा श्वास घेतला .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मार्ग मराठी, प्रवास मराठी

No Bread High-Protein Sandwich: वीकेंडला हाय प्रोटीन ब्रेकफास्ट हवाय? मग ही नो-ब्रेड ‘मूग डाळ सँडविच’ रेसिपी तुमच्यासाठीच

IPL 2026 : मॅन ऑफ दी मॅच, Orange Cap... विराट कोहलीने रणशिंग फुंकले! मोठा दावा; म्हणाला, चिन्नास्वामी स्टेडियमवर आता...

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

SCROLL FOR NEXT