Drainage water on Kondhwa Khurd road 
पुणे

कोंढव्यात ड्रेनेजच्या समस्येने नागरिक त्रस्त

ड्रेनेज लाईनच्या चेंबरमधून मैलामिश्रित पाणी रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा

कोंढवा - कोंढवा खुर्दमधील कोनार्क पुरम सोसायटीसमोर मुख्य रस्त्यांवर नाज हॉटेलशेजारी ड्रेनेज लाईनच्या चेंबरमधून मैलामिश्रित पाणी रस्त्यावर येत आहे. हा कोंढवा परिसरातील मुख्य रस्ता असून मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यामुळे परिसरातील आणि या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत असून संडासाचे पाणी रस्त्यांवर येत असेल तर येथे राहायचे कसे असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत.

ड्रेनेजचे हे दुर्गंधीयुक्त पाणी संपूर्ण रस्त्यांवर येत असताना वाहनांचीही रस्त्यावरून ये-जा असते. त्यामुळे तेच पाणी दुसऱ्यांच्या अंगावर जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी तर परसरलीच आहे. शिवाय, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाला आहे. या चेंबरमधून पाणी वर येऊन त्यामधून संडासाची घाणही येते आणि ती रस्त्यांवर साचते. याकडे महापालिका विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

लोकप्रतिनीधींनी गेले पाच वर्षे काम कमी आणी कार्यक्षमतेचा ढिंढोरा जास्त वाजविला आहे. कोणतेही काम व्यवस्थित आणि दूरदृष्टी ठेवून करण्यात आलेले नाही. शासन आणि प्रशासनाचे हे अपयश आहे. आतातरी यावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी अस्लम बागवान यांनी केली आहे.

ड्रेनेजच्या चेंबरचे काम सातत्याने सुरु आहे. दोन दिवसांपूर्वीच काम केले आहे. काही ठिकाणी ड्रेनेजच्या लाईन छोट्या असून पावसाचे पाणी ड्रेनेजमध्ये जात असल्याने ही अडचण निर्माण होत आहे. लवकरच सर्व ठिकाणच्या चेंबरची दुरुस्ती करुन ही अडचण दूर करण्यात येईल.

- शाम तारू, सहाय्यक आयुक्त, वानवडी क्षेत्रिय कार्यालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT