drainage water on road sakal
पुणे

चेंबरमधील दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

मिठानगर-कोंढवा : पालिका प्रशासनाने तातडीने चेंबर दुरुस्ती करावी

मोहिनी मोहिते

कॅन्टोन्मेंट : मिठानगरमध्ये (कोंढवा खुर्द) दाट लोकवस्ती असून, अरुंद रस्ते, ड्रेनेज लाईन, चेंबरची झाकणे तुटणे, दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहन्याचे प्रकार फक्त पावसाळ्यात नाही, तर वारंवार होत असल्याने स्थानिक नागरिक कमालीचे त्रासले आहेत. पालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चेंबरची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. आतापर्यंत नगरसेवक असणाऱ्यांनीच त्यांनीच ड्रेनेज लाईन, रस्ते, चेंबरची कामे केली आहेत. मात्र, नगरसेवकपदाचा कार्यकाल संपताच त्यांना आतापर्यंत मिठानगरमधील नागरिकांच्या आरोग्याचा कळवळा का आला, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

कोंढवा खुर्द- मिठानगरमधील (प्रभाग क्र.२७) समस्या सोडविण्याकडे मनपा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांवरील बेगडी प्रेम दाखवत माजी नगरसेवकांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, मिठानगर मुख्य रस्त्यावरील चेतना गार्डन सोसायटीसमोरील ड्रेनेजचे झाकण तुटले असून, दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. नगरसेवकांची मुदत संपल्याने सध्या पालिका प्रशासन आहे. प्रशासनाने दोन-तीन दिवसांत दखल घेतली नाही, तर नागरिकांना बरोबर घेऊन पालिकेवर आक्रोश आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी नगरसेवक गफुर पठाण यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT