Disinfection 
पुणे

निर्जंतुकीकरणासाठी आता वापरणार 'यूव्ही ब्लास्ट' यंत्र; डीआरडीओने केले विकसित

सकाळवृत्तसेवा

पुणे - संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वतीने सांसर्गाचे प्रमाण जास्त असलेल्या क्षेत्राच्या निर्जंतुकीकरणासाठी अतिनील (यूव्ही) टॉवर विकसित करण्यात आला आहे. या टॉवरच्या साहाय्याने जलद आणि रसायनमुक्त निर्जंतुकीकरण करणे सोपे आहे.

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

देशभरात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेत या यंत्रणाची निर्मिती करण्यात आली असून यामुळे सांसर्गाचे प्रमाण जास्त आलेल्या भागांना निर्जंतुकीकरण करण्यास कोणत्याही रसायनाची गरज पडणार नाही. या यंत्रणाला 'यूव्ही ब्लास्ट' असे नाव देण्यात आले आहे. तसेच याची निर्मिती डीआरडीओची 'लेझर सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेन्टर' (लास्टेक) प्रयोगशाळा आणि गुरुग्राम येथील 'न्यू एज इंस्ट्रूमेंट्स अँड मटेरियल्स प्रायव्हेट लिमिटेड' यांच्या मार्फ़त करण्यात आली आहे.

रासायनिक पद्धतींनी निर्जंतुकीकरणासाठी योग्य नसलेल्या प्रयोगशाळा आणि कार्यालयांमध्ये 'इलेक्ट्रॉनिक' उपकरणे, संगणक आणि इतर गॅझेट्सला सॅनिटायझ करण्यासाठी 'यूव्ही ब्लास्टर' उपयुक्त आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असलेल्या विमानतळ, शॉपिंग मॉल्स, मेट्रो, हॉटेल, कारखाने, कार्यालये सारख्या ठिकाणी याचा वापर केला जाऊ शकतो.

'यूव्ही ब्लास्टर'चे वैशिष्ट्य
- 'यूव्ही ब्लास्टर'द्वारे 30 मिनिटांमध्ये 400 स्क्वेअर फूट क्षेत्राचे निर्जंतुकीकरण 
- आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण उपकरण
- यूव्ही ब्लास्टरला लॅपटॉप किंवा मोबाईलद्वारे 'वायफाय लिंक'च्या साहाय्याने वापरण्यात येते
- या उपकरणाला खोलीमध्ये ठेवल्यास, दरवाजा उघडताना किंवा कोणत्याही व्यक्तीने खोलीत प्रवेश केल्यास आपोआप निर्जंतुकीकरणाला सुरुवात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT