rajnath singh sakal
पुणे

भारताला सुपरपावर बनवण्यासाठी DRDO कार्यरत - राजनाथ सिंह

राजनाथ सिंह हे सध्या पुणे दौऱ्यावर असून येथील विविध संरक्षण संस्थांना भेट देत आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : "जगभरात भारताला 'सुपर पावर' बनवण्यासाठी अद्ययावत आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या विकासावर भर दिला पाहिजे. यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील (डीआरडीओ) शास्त्रज्ञ सातत्याने कार्य करत आहेत." असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (rajnath singh) यांनी केले.

राजनाथ सिंह हे सध्या पुणे (pune) दौऱ्यावर असून येथील विविध संरक्षण संस्थांना भेट देत आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी खडकवासला येथील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी (डीआयएटी) या संस्थेला भेट दिली. या प्रसंगी ते बोलत होते. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी, डीआयएटीचे कुलगुरू डॉ. सी. पी रामनारायणन आदी उपस्थित होते.

राजनाथ सिंह म्हणाले, "लष्कराशी संबंधित वेगवेगळया संस्थातील शास्त्रज्ञांचे काम, क्षमता पाहता संरक्षणमंत्री असल्याचा अभिमान वाटताे. शास्त्रज्ञांच्या संशोधनाला खासगी उद्योगाच्या साहाय्याने उत्पादन क्षेत्रात ही प्रगती होत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नागपूरमध्ये नुकतेच एका खासगी उद्योगाने पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल एक लाख हँड ग्रेनेडतयार करून लष्कराला सुपूर्द केले आहे. इतकंच नाही तर परदेशातही याची निर्यात केली जात आहे. अशाच प्रकारे तंत्रज्ञानात आपण आघाडी मिळवली तर जगात भारत महासत्ता बनू शकते. त्यादृष्टीने जग आपल्याकडे पाहत आहे."

कोरोनाकाळात डीआयएटीने समाज उपयोगी तंत्रज्ञान विकसित केले. त्यामुळे नऊ पेटंट या संस्थेकडे आहेत व हे तंत्रज्ञान उद्योगांना हस्तांतरित करण्यात आले आहे. त्याचबरोबर क्वांटम तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डीप ओशन एक्सप्लोरेशन सारख्या क्षेत्रात ही संस्था संशोधन करत आहे. त्यामुळे येत्या काळात देशाततील आघाडीची संस्था म्हणून डीआयएटीची ओळख निर्माण होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

डीआयएटी या संस्थेची केवळ राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत राहू, असे यावेळी डॉ. रामनारायणन यांनी सांगितले. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला अतिशय योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे. यासाठी संरक्षण विभागातर्फे विविध प्रकारच्या योजना व प्रयोग केले जात आहेत. यासाठी संरक्षण क्षेत्रातील संस्था, तिन्ही दल, उद्योग क्षेत्रांमध्ये समन्वयाची गरज आहे.  उच्च दर्जाचे ज्ञानाचे आदान प्रदान होईल व त्यातून नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणे शक्य होईल.

'इनोव्हेशन'ला चालना देण्यासाठी केंद्र सरकारची भूमिका

  • 'आयडेक्स'साठी एक हजार कोटी रुपयांचा निधी

  • संरक्षण आणि ऐरोस्पेस इनोव्हेशनसाठी देशातील 300 हून अधिक स्टार्टअप्सचा समावेश

  • यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी राखीव

  • संशोधन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी पाच वर्षांसाठी सुमारे 50 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध दिला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Temperature Drop: नागपुरात थंडीची लाट! तापमान १०.८ अंशांवर; नागरिकांना हुडहुडी

Sakal Suhana Swasthyam : अमृताकडे जाण्याचा मार्ग ज्ञानेश्वरीतून प्रशस्त; आध्यात्मिक योगगुरू श्री एम यांचे प्रतिपादन

FIFA World Cup 2026 : मेस्सी विरुद्ध रोनाल्डो QF मध्ये भिडणार; वर्ल्ड कप २०२६ चे गट जाहीर, डोनाल्ड ट्रम्प यांना 'शांतता' पुरस्कार

MPSC Exams 2026: एमपीएससी 2026 वेळापत्रक जाहीर; राज्यसेवा, वनसेवा, गट-ब–क परीक्षांचे दिनांक स्पष्ट

Panchang 6 December 2025: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT