drink and drive accident two injured police hospital pune kothrud
drink and drive accident two injured police hospital pune kothrud esakal
पुणे

Pune Accident News : कोथरुड परिसरात मद्यधुंद मोटारचालकाची वाहनांना धडक

सकाळ वृत्तसेवा

Pune Accident : कोथरूड परिसरात कर्वे रस्त्यावर शनिवारी मध्यरात्री मोटारचालकाने चार ते पाच वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. मोटारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वे रस्त्यावरील सुखकर्ता डायनिंग हॉलसमोर मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास भरधाव मोटारीने चार ते पाच वाहनांना धडक दिली. या अपघातात दोघांना दुखापत झाली आहे. त्यांना खासगी रुग्णालयात उपचार करुन सोडण्यात आले. पोलिसांनी चौकशीसाठी मोटारचालकाला ताब्यात घेतले आहे.

या संदर्भात परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त सोहेल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारचालकाने मद्य सेवन केल्याचा संशय आहे. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. पोलिसांनी मोटारचालकाचा जबाब घेतला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT