Drink boiled water Appeal of Pune Municipal Water Supply Department sakal
पुणे

पिण्याचे पाणी उकळून प्या; महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे आवाहन

खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने मातीमिश्रित पाणी वाहून येत आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने मातीमिश्रित पाणी वाहून येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस गढूळ पाणी येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाणी उकळून व गाळून द्यावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पाण्यासोबत माती वाहून येण्याचे प्रमाण जास्त असल्याने हे पाणी गढूळ आहे.

हेच पाणी जलवाहिनीतून महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात येत आहे. याठिकाणी पाणी शुद्ध करून नागरिकांना पुरविले जात आहे. पण तरीही नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन महापालिकेने केले आहे. दरम्यान, पाण्याची गढूळतेचे (टर्बिडीटी) १० पेक्षा कमी असणे आवश्‍यक आहे. सध्या हे टर्बिडीटीचे प्रमाण ८ वरून १४ वर गेले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT