drink person attack on women police marshal and beat two Sakal
पुणे

Pune News : मद्यधुंद तरुणाकडून महिला पोलिस बीट मार्शलवर हल्ला

आरोपीने फुटलेल्या काचेच्या बाटलीने महिला पोलिस मार्शलवर हल्ला केला.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : मद्यधुंद तरुणाने दारूची बाटली फोडून काचेने दोघांना मारहाण केली. त्यानंतर घटनास्थळी गेलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यावरही तरुणाने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना लष्कर परिसरात घडली.

या प्रकरणी रुपेशकुमार सोनकांबळे (वय २६, रा. बिबवेवाडी) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी दुपारी सोनकांबळेंचा मित्र रोहित लोखंडे यांना एकजण सोलापूर बाजार परिसरात मारहाण करत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर लोखंडे घटनास्थळी गेले. त्यांनी आरोपीला जाब विचारला. त्यावेळी आरोपीने फुटलेल्या काचेच्या बाटलीने सोनकांबळे यांच्यावर हल्ला केला.

दरम्यान, पोलिस नियंत्रण कक्षातून सोलापूर बाजार परिसरातील घटनेबाबत महिला बीट मार्शल यांना कॉल आला. त्या तेथे पोचल्या. महिला पोलिसाने मद्यधुंद आरोपीला फुटलेली काचेची बाटली टाकण्यास सांगून रोखण्याचा प्रयत्न केला.

परंतु आरोपीने महिला पोलिसावरही हल्ला करून त्यांचा मोबाईल फेकून दिला. त्यानंतर काचेच्या तुकड्याने गळा चिरून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार व्ही. एन. डेंगळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Apple Pay आता भारतात सुरू; Axis Bankच्या कार्डधारकांना मिळणार सुविधा, जाणून घ्या कसं वापराचं

‘सारेगमप’चं शूटिंग संपवून ट्रेनने घरी निघाले, अन् पहिले पीरियड्स आले'; श्रेया घोषाल आठवण सांगत म्हणाली, 'वडिलांनी पॅड आणलं आणि..'

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

SCROLL FOR NEXT