पुणे

पुणे तिथे काय उणे! MIT च्या पोरांनी तयार केली ड्रायव्हरलेस कार

सम्राट कदम

पुणे : चालकविरहीत स्वयंचलीत कार ही आपल्यासाठी आता भविष्यकालीन गोष्ट राहीली नाही. पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी अशी ड्रायव्हरलेस कार तयार केली असून, तीचे नुकतेच आनावरण करण्यात आले आहे. माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी आणि यंत्र अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. महेश काकांडीकर यांनी यासंबंधीची घोषणा केली.

विद्यापीठाच्या यंत्र अभियांत्रिकी (मेकॅनिकल) आणि अणुविद्युत व दूरसंचार (ई अ‍ॅण्ड टीसी) विभागातील शेवटत्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ही गाडी विकसित केली आहे. अनावरण संगी यश केसकर, सुधांशु मणेरीकर, सौरभ डमकले, शुभांग कुलकर्णी, प्रत्यक्ष पांडे आणि प्रेरणा कोळीपाका या विद्यार्थांनी चालक विरहित, स्वायत्त, विद्युत, चारचाकी आणि चार आसनी बोल्ट - ऑन ऑटोनॉमस व्हेइकलचे प्रात्यक्षिक दाखविले. प्रा. श्रीकांत यादव आणि प्रा. ओंकार कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एमआयटी कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड, कुलगुरू डॉ. एन.टी. राव व इंजिनिअरिंगचे अधिष्ठाता डॉ. प्रसाद खांडेकर यांची यात महत्त्वपुर्ण भुमिका आहे.

स्वयंचतीलत गाडीचे वैशिष्ट्ये ः

  • कृत्रीम बुद्धिमत्तेसंबंधीची अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर

  • ही गाडी लेव्हल थ्री ऑटोनॉमीवर आधारित असून यात बीएलडीसी मोटर्सचा वापर

  • ऊर्जा देण्यासाठी लिथीयम आयर्न बॅटरीचा वापर

  • लिडर कॅमेरे, मायक्रोप्रोसेसर, स्वयंचलित क्रिया नियंत्रित करणारी यंत्रणा

  • विविध सेन्सर्ससह अनेक एआय आणि एमएल अल्गोरिदम वापरून स्टीयरिंग, थ्रॉटल आणि ब्रेकवर नियंत्रण ठेवण्यात येते

आकडे बोलतात

  • गाडीची पॉवर ः ३ किलो वॅट

  • चार्जिंगसाठी लागनारा वेळ ः ४ तास

  • एका चार्जिंगमध्ये प्रवासाची क्षमता ः ४० किलोमीटर

''कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून मानवी चुकांमुळे होणारे अपघात आणि मृत्यू कमी करण्यास मदत होईल. चालक विरहित स्वायत्त वाहन विद्यार्थ्यांनी प्रकल्पातून सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुणे स्मार्ट सिटी आणि मेट्रो व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्‍यांनी या वाहनाचे अनुलोकन करून याचा पुणेकरांच्या सेवेसाठी उपयोग होईल.

- प्रा.प्रकाश जोशी, एमआयटीचे संस्थापक विश्वस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT