Pune Bopdev Ghat News sakal
पुणे

Pune Bopdev Ghat News: डॉ. नीलम गोऱ्हे यांची 'बोपदेव घाटातील' पोलिस चौकीला भेट

Pune Bopdev Ghat News: बोपदेव घाटासह परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या पोलिस चौकीला शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट देऊन आढावा घेतला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे: बोपदेव घाटासह परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या पोलिस चौकीला शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट देऊन आढावा घेतला. तसेच, भविष्यात चुकीच्या घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याबाबत पोलिसांना सूचना दिल्या.

घाटातील रस्त्यांवर प्रचंड अंधार असल्याने प्रकाश खांब लावणे गरजेचे आहे. याबाबत ऊर्जा विभाग, महापालिका आणि पोलिस विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल. येथील पोलिस चौकीत कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल टॉयलेटची सोय, चौकीतील खिडक्यांना सुरक्षा जाळी आणि घाट क्षेत्रात मोबाईल नेटवर्क सुविधा वाढविण्याबाबत पोलिस आयुक्तांकडे पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

पोलिस प्रशासनाकडून करण्यात आलेली सर्च लाईट व्यवस्था, ध्वनिक्षेपकाद्वारे करण्यात येणारी घोषणा आणि या भागात तैनात करण्यात आलेल्या पोलिसांच्या गस्ती पथकाबाबत डॉ. गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी पोलिस कर्मचारी सुषमा हिंगमिरे, सर्जेराव चव्हाण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Smartwatch Technology: हाताची हालचाल की चालणे? स्मार्टवॉचला कसे कळते तुम्ही किती चाललात? पाहा इनबिल्ट सेन्सर्सचे तंत्रज्ञान...

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

SCROLL FOR NEXT