sakal
पुणे

Ambegaon Drone News: ड्रोनच्या घिरट्या अन् चोरीच्या घटना; आंबेगावच्या पूर्व भागातील सत्र थांबेना..

For the past month, unknown drones have been flying over the eastern part of Ambegaon taluka during the night: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पोंदेवाडी परिसरात अज्ञात ड्रोनच्या घिरट्या काही काही बंद होईना आणि चोरीचे सत्रही थांबेना.

सकाळ वृत्तसेवा

Pune: चारच दिवसांत मंदिराचा दरवाजा तोडून मूर्तीवरील दागिने चोरीच्या दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोमवारी (ता. १५) पहाटे रोडेवाडी फाट्याजवळ असलेल्या श्री कळमजाई मंदिराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून देवीच्या गळ्यातील सोन्याचे चार मणी व सोन्याचे एक वाटी, अशी सुमारे २५ ते ३० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

संदीप रोडे हे सोमवारी सकाळी दर्शनाला गेले असता कडी कोंडा तोडून चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांना फोन करून चोरी झाल्याचे सांगितले. अनिल वाळुंज, संदीप पोखरकर, अमोल वाळुंज, माजी सरपंच पोपट रोडे, सतीश घोलप, अशोक वाळुंज, केरभाऊ घोलप यांनी तत्काळ मंदिराकडे जाऊन मंदिराचे पाहणी केली असता चोरट्यांनी कुलूप तोडता न आल्यामुळे कडी कोंडा तोडून मंदिरात प्रवेश करून देवीच्या गळ्यातील चार सोन्याचे मणी व सोन्याचे एक वाटी, अशी सुमारे २५ ते ३० हजार रुपयांच्या ऐवज चोरुन नेले.

याबाबत अनिल वाळुंज यांनी पारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांना माहिती दिली. त्यांनी मंदिराची पाहणी केली. विशेष म्हणजे मंदिरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील रोडेवाडी फाटा चौकात मध्यरात्री एक वाजेपर्यंत पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत होते. तरीही चोरीची घटना घडली आहे.

दरम्यान, मागील काही दिवस या मंदिर व परिसरात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर ड्रोनच्या घिरट्या सुरू असल्यामुळे चोरटेच ड्रोनद्वारे रेकी करून चोरी करत असल्याचे नागरिक म्हणत आहेत. चारच दिवसांपूर्वी गुरुवारी (ता. ११)पहाटे कळमजाई मंदिरापासून जवळच सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री काळूबाई मंदिराच्या दरवाजाच्या कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी देवीच्या अंगावरील दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ४० हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टिम मशिन, असा एकूण सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या दोन घटना घडल्याने नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

एक महिन्यापासून आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. ड्रोनच्या भीतीने गावागावात रात्रीच्या वेळी तरुण जागे राहून गस्त घालत आहेत. शासनाची कोणतीच यंत्रणा याबाबत अधिकृत खुलासा करत नाही.

मागील आठवड्यात मंचर येथे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या झालेल्या जनता दरबारात नागरिकांनी ड्रोनबाबत विचारणा केली असता डॉ. अमोल कोल्हे त्यांनी शासनाकडे मागणी केली की, राज्याच्या गृहमंत्र्याने विधानसभेत ड्रोनबाबत स्पष्टीकरण द्यावे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे ड्रोनबाबत प्रश्‍न विचारून माहिती देण्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप त्यावरही शासनाकडून अधिकृतरीत्या कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याने नागरिकांचा संभ्रम कायम आहे.

ड्रोनबाबत नागरिकांमध्ये संभ्रम

एक महिन्यापासून आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. त्यामुळे अनेक अफवा पसरत असल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली आहे. ड्रोनच्या भीतीने गावागावात रात्रीच्या वेळी तरुण जागे राहून गस्त घालत आहेत. शासनाची कोणतीच यंत्रणा याबाबत अधिकृत खुलासा करत नाही. मागील आठवड्यात मंचर येथे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या झालेल्या जनता दरबारात नागरिकांनी ड्रोनबाबत विचारणा केली असता डॉ. अमोल कोल्हे त्यांनी शासनाकडे मागणी केली की, राज्याच्या गृहमंत्र्याने विधानसभेत ड्रोनबाबत स्पष्टीकरण द्यावे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे ड्रोनबाबत प्रश्‍न विचारून माहिती देण्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप त्यावरही शासनाकडून अधिकृतरीत्या कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याने नागरिकांचा संभ्रम कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani News : सप्तशृंगगडावर आज रंगणार कोजागरीचा महासोहळा; कावड यात्रेसह तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव

Aapli ST App : बस स्टँडवर एसटीची वाट बघत थांबताय? तुमचं टेन्शन मिटलं! ‘Aapli ST’ अ‍ॅपवर कळणार Live लोकेशन, पण कसं? पाहा एका क्लिकवर

थैलावाचा साधेपणा! रस्त्यावर केलं जेवण, कामातून घेतला आध्यात्मिक ब्रेक

Mud Volcano: अंदमानमधील चिखलाचा ज्वालामुखी सक्रिय; भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पाठवणार संशोधन पथक

Ahilyanagar News:'अहिल्यानगर शहरात प्रेम विवाहातून प्राणघातक हल्ले वाढले'; जोडप्यांचा टोकाचा निर्णय..

SCROLL FOR NEXT