PGR26B03730
पांगरी (ता. बार्शी) : मंडलातील गोरमाळे शिवारात ड्रोनद्वारे होणारी सोयाबीनवर फवारणी.
---
पंपाची कटकट टळली; ड्रोनने फवारणी सोपी
पांगरीतील शेतकऱ्यांचा आधुनिकतेकडे कल; एकरी येतो ५०० रुपये खर्च
बाबासाहेब शिंदे : सकाळ वृत्तसेवा
पांगरी, ता. १८ : शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून, ग्रामीण भागातील तरुण शेतकरी पारंपरिक पद्धतीला तंत्रज्ञानाची जोड देत आहेत. पिकांवर कीडनाशकांची फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याकडेही शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
पांगरी परिसरात खरीप हंगामात सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. सध्या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने वेळेत कीडनाशकांची फवारणी करणे आवश्यक झाले आहे. मात्र पिकांची वाढ झाल्याने पारंपरिक पंपाद्वारे शेतात उतरून फवारणी करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे शेतकरी ड्रोन फवारणीला पसंती देत आहेत.
गोरमाळे येथील तरुण शेतकरी सुहास गिराम यांनी ड्रोन खरेदी करून स्वतःच्या सोयाबीनसह परिसरातील अन्य पिकांवर फवारणी सुरू केली आहे. ड्रोनद्वारे एका एकरासाठी सुमारे १२ लिटर पाण्याचा वापर होतो. पिकांपासून सहा ते सात फूट उंचीवर ड्रोन उडवून फवारणी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना किंवा मजुरांना पिकांमध्ये जाण्याची गरज भासत नाही. परिणामी पिकांचे नुकसान तसेच फवारणी दरम्यानचा शारीरिक त्रास व जोखीम कमी होते.
मजुरांची कमतरता, वाढता उत्पादन खर्च आणि वेळेचे नियोजन लक्षात घेता ड्रोन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त पर्याय ठरत आहे. मोठ्या क्षेत्रावर अल्पावधीत फवारणी होत असल्याने वेळ, पाणी व मनुष्यबळाची बचत होत आहे.
---
चाैकट
आता दमदार पावसाची प्रतीक्षा
सध्या सोयाबीनला फुलधारणा होऊन शेंगा तयार होण्याची अवस्था सुरू झाली आहे. त्यामुळे पिकांना पावसाची गरज वाढली आहे. पांगरी परिसरातील माळरान व हलक्या जमिनीवरील सोयाबीनची पिके दुपारच्या वेळी सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता दमदार पावसाकडे लागले आहे.
---
कोट
PNE26W43166
ड्रोन फवारणीसाठी एकरी सुमारे ५०० रुपये खर्च येतो. एका दिवसात जवळपास १८ एकर क्षेत्रावर फवारणी करता येते. ड्रोनसाठी सुमारे साडेपाच लाख रुपये खर्च आला असून, सहा बॅटरी संच उपलब्ध आहेत. एका बॅटरीने सुमारे दोन एकर क्षेत्रावर फवारणी करता येते.
- सुहास गिराम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.