PGR26B03407
पांगरी : येथे कृषी विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी मंडल कृषी अधिकारी सुधीर काशीद, उपकृषी अधिकारी ए. बी. डोळसे यांच्यासह शेतकरी.
आधुनिक शेतीकडे वाटचाल; शेतकऱ्यांना ड्रोन अनुदान
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत पांगरीत कार्यक्रमाचे आयोजन
पांगरी, ता. ३० : बदलत्या काळानुसार शेती अधिक आधुनिक, उत्पादनक्षम आणि कमी श्रमाची व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाच्या ‘राज्य कृषी यांत्रिकीकरण’ योजनेअंतर्गत गोरमाळे येथील शेतकऱ्यांना ड्रोन घटकाचा लाभ देण्यात आला. या कार्यक्रमास मंडल कृषी अधिकारी सुधीर काशीद, उपकृषी अधिकारी ए. बी. डोळसे, सहायक कृषी अधिकारी संदीप झाडके, पी. एम. नागटिळक, डी. जी. घोळवे, के. एन. काळेल यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
कृषी विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमात शेतकऱ्यांना शेतीतील यांत्रिकीकरणाचे महत्त्व पटवून देत प्रगत व आधुनिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. वाढती मजुरी, मजुरांची टंचाई आणि शेतीतील वाढते खर्च लक्षात घेता शेतीचे यांत्रिकीकरण ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या या योजनेद्वारे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र तसेच ड्रोनसारखी महागडी कृषी अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जात आहे. या सहाय्यामुळे लहान व मध्यम शेतकऱ्यांनाही आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर शक्य होत आहे. यावेळी मार्गदर्शन करताना मंडल कृषी अधिकारी सुधीर काशीद व उपकृषी अधिकारी ए. बी. डोळसे यांनी यांत्रिकीकरणाचे विविध फायदे स्पष्ट केले. आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने कमी वेळेत मोठ्या क्षेत्रावर काम करता येते. पेरणी व कापणी वेळेत पूर्ण झाल्याने उत्पादनाची गुणवत्ता सुधारते. योग्य खोलीवर पेरणी, समतोल मशागत आणि आंतरमशागतीमुळे पिकांची वाढ जोमदार होऊन उत्पन्नात वाढ होते. पारंपरिक शेतीतील शारीरिक श्रम कमी होऊन शेती व्यवसाय अधिक सुसह्य होतो, असे त्यांनी सांगितले. कमी क्षेत्रधारक शेतकऱ्यांनी गटाने यंत्रे खरेदी करणे किंवा भाड्याने यंत्रांचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरेल, असेही यावेळी नमूद करण्यात आले. योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत, शासनाच्या अनुदानामुळे अत्याधुनिक यंत्रे घेणे शक्य झाल्याचे सांगितले. या योजनेमुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होईल व आर्थिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.