ड्रोन सर्व्हेमुळे गावठाण भूमापनात अचुकता येणार - अजित पवार  saka
पुणे

ड्रोन सर्व्हेमुळे गावठाण भूमापनात अचुकता येणार - अजित पवार

बारामती तालुक्यातील गावठाण भूमापन ड्रोन सर्व्हेचा प्रारंभ कटफळ येथे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : ड्रोन सर्व्हेमुळे गावठाण भूमापनात अधिक अचूकता येईल, प्रत्येकाच्या जागा व मिळकतीचा नकाशा तयार होईल, सीमा निश्चित होतील, त्याचा फायदा व्यक्तीसह ग्रामपंचायतीला होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी व्यक्त केला.

ग्रामविकास विभाग, जमाबंदी आयुक्त व भारतीय सर्वेक्षण विभाग (डेहराडून) यांच्या विद्यमाने बारामती तालुक्यातील गावठाण भूमापन ड्रोन सर्व्हेचा प्रारंभ कटफळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जमाबंदी आयुक्त एन. सुधांशु, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपसंचालक भूमि अभिलेख किशार तवरेज, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख सुर्यकांत मोरे, उप अधिक्षक भूमि अभिलेख गणेश कराड, कटफळच्या सरपंच पूनम कांबळे उपस्थित होते.

पवार म्हणाले की, स्वामीत्व योजनेअंतर्गत गावठाणचे भूमापन ड्रोनच्या सहाय्याने करण्यात येत आहे. 1890 मध्ये ब्रिटीशांनी मोजणी सुरु केली, त्यांना हे काम पूर्ण करण्यास 37 वर्षे लागली. आज ड्रोन सर्व्हेने भूमापनातील अडचणी कमी होतील. विकासाला चालना मिळेल. ग्रामस्थांनी भूमापनात अडथळा आणू नये, योग्य प्रकारे सर्व्हेक्षण करुन घ्यावे . प्रत्येक गावाचा डिजीटल नकाशा तयार करुन घ्यावा. बारामतीत 118 गावे असून यापूर्वी 47 गावांचे नगर भूमापन झालेले असून उर्वरित 71 गावांपैकी 18 गावांना मूळ गावठाण नाही त्यामुळे फक्त 53 गावांचे नगर भूमापन करण्यात येऊन त्यांना मिळकत पत्रिका देण्यात येतील, अशी माहिती उप अधीक्षक भूमी अभिलेख गणेश कराड यांनी दिली.

ड्रोन सर्व्हेची वैशिष्ट्ये

  • प्रत्येक धारकांच्या जागेचा आणि मिळकतीचा नकाशा तयार होईल, या निमित्तानं सीमा निश्चित होतील आणि मिळकतीचे नेमके क्षेत्र माहिती होईल.

  • प्रत्येक धारकाला मिळकतीची मालकी हक्क संबंधी मिळकत पत्रिका आणि सनद मिळेल.

  • गावठाणातील जागेच्या मिळकत पत्रिकेत शेतीच्या 7/12 प्रमाणेच धारकाच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून कायदेशीरदृष्ट्या मान्यता मिळणार आहे.

  • मिळकत पत्रिके आधारे संबंधित धारकास बँक कर्ज उपलब्ध होऊ शकते, तारण करता येईल, जामिनीचा मालक म्हणून राहता येईल आणि विविध आवास योजनांचे लाभ घेता येतील.

  • बांधकाम परवानगीसाठी आवश्यक असणारी मिळकत पत्रिका उपलब्ध होणार आहे.

  • सीमा माहिती असल्यामुळे धारकांना आपल्या मिळकतींचे संरक्षण करता येईल.

  • गावठाणातील जमीन विषयक मालकी हक्कांबाबत व हद्दींबाबत निर्माण होणारे वाद संपुष्टात आणण्यास गावठाण भूमापन नकाशे व अभिलेखांचा उपयोग होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT