पुणे

आंतरमंत्रालयीन केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक बार्शीत

CD

BAR26B13924
बार्शी : तालुक्यातील उपळाईच्या शिवारात शेतकरी कल्याण चव्हाण यांच्याकडून पीक परिस्थिती जाणून घेताना केंद्रीय पथकातील अधिकारी.
---
आंतरमंत्रालयीन केंद्रीय
दुष्काळ पाहणी पथक बार्शीत
उपळाई ठोंगे, पानगावात पिकांची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
बार्शी, ता. ९ : सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आंतरमंत्रालयीन केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी साडेचारच्या सुमारास अहिल्यानगर जिल्ह्यातून करमाळामार्गे उपळाई ठोंगे (ता. बार्शी) येथे दाखल झाले. पीक विभागाचे संचालक डॉ. के. पोन्नुसामी यांच्या नेतृत्वाखालील या पथकात पेयजल विभागाचे प्रमुख अबसार अहमद खान आणि अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सहायक संचालक सुमीत शर्मा यांचा समावेश होता.
परांडा रस्त्यावरील उपळाई शिवारात पथकाने शेतकरी कल्याण ज्ञानदेव चव्हाण यांच्याशी संवाद साधून शेतीपिकांची माहिती घेतली. तूर व सोयाबीनच्या पेरणीसाठी झालेला खर्च, पाण्याचे स्रोत आणि भूजल पातळी याबाबत विचारणा केली. पेरणीपासून किती पाऊस झाला, जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता किती आहे, याचीही माहिती घेतली. चारा डेपो सुरू करणे सोयीचे ठरेल की चारा छावण्या, याबाबतही पथकाने विचारणा केली.
चव्हाण यांनी चार एकर क्षेत्रात पेरणी केली असून, त्यासाठी एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च झाल्याचे सांगितले. मात्र, सोयाबीन व तुरीचे पीक पूर्णपणे नष्ट झाल्याने उत्पन्न मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गावात पाणीटंचाई असून, टँकर सुरू करण्याची मागणी केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
पथकाने लता शेळवणे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचीही पाहणी केली. त्यानंतर पथकाने पानगाव येथे जाऊन तेथील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत पीक पाहणी केली.
यावेळी कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, तहसीलदार एफ. आर. शेख, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, मृद व जलसंधारण विभागाचे रामचंद्र क्षीरसागर, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे आणि ग्रामसेवक दराडे उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी ६० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, पुढील दोन ते तीन दिवसांत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करून शासनाला अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDIA Bloc Vijay Chowk Protest: 'इंडिया' आघाडीचे नेते राष्ट्रपती भवनात; विजय चौकात खासदारांचे ठिय्या आंदोलन

MP OBC Reservation : मोठी बातमी! मध्य प्रदेशात 27 टक्के OBC आरक्षणाला उच्च न्यायालयाचा नकार; 14 टक्के आरक्षण कायम, रखडलेल्या 13 टक्के जागा भरण्याचेही निर्देश

CJPच्या आंदोलनापूर्वी गृह मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवी दिल्लीत ४ किमीच्या परिसरात इंटरनेट सेवा बंद

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! देशभरातील 23 राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; मॉन्सूनच्या परतीची सीमा कुठपर्यंत? महाराष्ट्रात वातावरण कसं?

Ab De Villier Hundred: ११ Six, ६ Fours! एबीच्या ४० चेंडूंत ११४ धावा; ऑस्ट्रेलियाला धुतले, २१० धावांचे लक्ष्य सहज पार केले, तोच जलवा...

SCROLL FOR NEXT