पुणे

पूर्व हवेली दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

CD

केसनंद, ता. २७ : पूर्व हवेली तालुक्यातील ग्रामीण भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतीसह जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व हवेलीचा ग्रामीण भाग दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या हवेली तालुका पदाधिकाऱ्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी डुडी यांनी संबंधित विभागामार्फत परिस्थितीची पाहणी करून पंचनामे करण्यात येतील आणि त्यानुसार मदतीबाबत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
पूर्व हवेलीच्या ग्रामीण भागात पाणीटंचाई आणि शेतीसमोरील अडचणींमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतीचे नुकसान, जनावरांसाठी चारा उपलब्धतेचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई यांचा विचार करून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच, बाधित भागांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून द्यावी, अशी भूमिका शिवसेनेने मांडली.
यावेळी शिवसेनेचे हवेली तालुकाप्रमुख विपुल शितोळे, पुणे जिल्हा संघटक निलेश काळभोर, जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन, ॲड. गणेश मस्के, संदीप कांबळे आणि दीपक लोणारे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'माझे वडील गेलेत...' राम पूर्णेकर ओक्साबोक्शी रडले; पोलिसांनी बळजबरीने रिक्षात कोंबलं; ठाण्यात काय घडलं?

नागपूर पदवीधर निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत २१ अपक्ष उमेदवारांचं आंदोलन; आयोगाविरोधात घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?

Sugar Price Hike: दिवाळीपूर्वीच साखरेचे दर भडकले! पुण्यात किलोमागे 5 रुपयांची वाढ; एक किलो कितीला? दर आणखी वाढणार?

Latest Marathi News Live Update : जालन्यातील घुंगर्डे हदगावमध्ये लहान भावानेच केली मोठ्या भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या

ABHISHEK SHARMA: अभिषेक शर्माचा ३५ चेंडूंत शतकी धमाका! सूर्यकुमार यादवची बरोबरी, आता रोहित शर्माचा विक्रम मोडण्याचं लक्ष्य

SCROLL FOR NEXT