पुणे

चारा-पाणीटंचाईवर युद्धपातळीवर उपाययोजना करा – आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

CD

SGW26B10338 : डॉ. बाबासाहेब देशमुख

सांगोल्यातील २६ गावांत एक दिवसाचाही चारा नाही
आमदार देशमुख; २२ गावांमध्ये केवळ ४० दिवस पुरेल एवढाच चारा

सांगोला, ता. ८ : सांगोला तालुक्याला दुष्काळाचे संकट नवीन नाही. मात्र, या संकटावर मात करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. सध्या तालुक्यात पाणी व चारा टंचाईची परिस्थिती गंभीर बनत असून, आगामी काळातील संभाव्य संकट लक्षात घेता पाणी आणि चारा टंचाईवर युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, असे आवाहन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले. दरम्यान, तालुक्यातील २६ गावांमध्ये जनावरांसाठी एकाही दिवसाचा चारा उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली असल्याचे त्यांनी सांगितले.
२२ गावांमध्ये केवळ ४० दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक असून, उर्वरित ५० ते ५५ गावांमध्येही जेमतेम दीड ते दोन महिने पुरेल इतकाच चारा उपलब्ध आहे. त्यामुळे डिसेंबरनंतर चारा टंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता असून, चारा छावण्या अथवा चारा डेपो सुरू करण्यासाठी प्रशासनाने तातडीने नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
सांगोला पंचायत समितीच्या बचत भवन येथे आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. देशमुख यांनी महसूल, कृषी, पाणीपुरवठा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पंचायत समिती आणि नगरपालिका यांसह विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. टंचाई निवारणासाठी सुरू असलेल्या उपाययोजना, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
या बैठकीस तहसीलदार बाळूताई भागवत, कृषी अधिकारी दीपाली जाधव, मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, गटविकास अधिकारी योगेश कांबळे, सभापती पुनमताई इंगोले, उपसभापती अजय सरगर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

चौकट...
सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे
आमदार डॉ. देशमुख म्हणाले, तालुक्याने यापूर्वीही अनेक दुष्काळी संकटांचा सामना केला आहे. प्रत्येक वेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यतत्परता दाखवून प्रामाणिकपणे काम केल्यामुळे या संकटांवर मात करणे शक्य झाले. यापुढील काळातही प्रशासनातील सर्व विभागांनी एकत्रितपणे आणि समन्वयाने काम करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saudi Arabia Attack : आखातात पुन्हा युद्धाचा भडका! राजधानीवर बंडखोरांचा भीषण क्षेपणास्त्र हल्ला; प्रसिद्ध टॉवरचे मोठे नुकसान!

Pune News: शनिवार-रविवार पुण्यातील सिंहगडावर पर्यटकांची मांदियाळी; दोन दिवसांत ४ हजारांहून अधिक जणांची हजेरी

Shambhuraj Desai : "पाच हजार ही केवळ सुरुवात, पूर्ण मदत मिळणार"; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शंभूराज देसाईंचा मोठा दिलासा, सरकार सोबत असल्याचीही दिली ग्वाही

Latest Marathi News Live Update: : निलंग्यात मतदारांच्या पळवापळवीवरून राजकीय रणकंदन; औराद पोलिसांच्या मदतीने सोसायटी चेअरमनना कर्नाटकात नेल्याचा काँग्रेसचा गंभीर आरोप

Sinhagad Diwali Celebration: सिंहगडावर दिवाळी पहाटेचा अनोखा दीपोत्सव! कल्याण दरवाजात मशालींची रोषणाई, तानाजी मालुसरेंच्या समाधीवर दीपज्योती

SCROLL FOR NEXT