पुणे

कृषी बैठक बातमी

CD

मुख्य पान १ साठी
...
खरिपाच्या नुकसानीपोटी
हवेत साडेतेराशे कोटी

डॉ. पंकज आशिया ः साडेचौदाशे कोटींचा पीकविमा उतरविला

अहिल्यानगर, ता. ५ ः जिल्ह्यात यंदा एकूण ४४८.१० पैकी २९७.९० मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पावसाची एकूण ३४ टक्के तूट आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर एक व दोन लागू करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील एक हजार ६१० गावांतील १२ लाख १५ हजार शेतकऱ्यांचे एकूण नऊ लाख ६२ हजार ११६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे जिल्ह्यास १ हजार ३६५ कोटी रकमेची मागणी शासनस्तरावर करण्यात आलेली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित माध्यम संवाद कार्यक्रमावेळी दुष्काळाच्या आढाव्याची माहिती देताना आशिया बोलत होते. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, ‘आत्मा’चे उपसंचालक प्रदीप लाटे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलावंत आदी उपस्थित होते.
रब्बी हंगामासाठी चारा लागवडीबाबत क्षेत्रियस्तरावरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. रब्बी ज्वारी पिकाकरिता शेतकऱ्यांना २१ हजार मिनी कीट मोफत वाटप करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे, यामधून शेतकऱ्यांना चारा उपलब्ध होणार असल्याचे आशिया म्हणाले.
बोराळे म्हणाले, की पीकविमा व पीक कापणी प्रयोगामध्ये जिल्ह्यात एकूण चार लाख ९५ हजार ८०६ शेतकऱ्यांनी दोन लाख ६६ हजार ९६५ हेक्टर क्षेत्राकरिता एक हजार ४७१ कोटी रकमेचा पीकविमा उतरविला आहे. हवामान आधारित फळपीक विमा योजनेमध्ये ११ हजार ७२८ शेतकऱ्यांनी सहा हजार ९१७ हेक्टर क्षेत्राकरिता ७१.५२ कोटी रकमेचा पीकविमा सहभाग नोंदविलेला आहे. खरीप हंगामामध्ये मूग व उडीद पिकांचे सर्व पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत. पिकांचे संकलन शासनास सादर करण्यात आले आहे. आजअखेर सोयाबीन पिकाचे शंभर टक्के, बाजरी पिकाचे ९८ टक्के, मका पिकाचे ८४ टक्के, पीक कापणी प्रयोग झालेले आहेत. संकलन अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा! ईडीची केस बंद; प्रकरण काय?

Pune Crime: पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एकीकडे ८७ लाखांची सायबर फसवणूक, तर दुसरीकडे लाखोंचे दागिने अन् रोकड लंपास

Pune News: सकाळी साडेअकराची बैठक थेट दुपारी चारनंतर! पुणे महापालिकेच्या स्थायी समितीवर विरोधी पक्षनेते निलेश निकम यांची टीका

Success Story: दिवसा शिक्षण, रात्री सफाईचे काम; जिद्दीने मिळवली सूक्ष्मजीवशास्त्राची पदवी, कोथरूडच्या रेश्माचा प्रेरणादायी प्रवास..

Gangapur News: अंगणवाडी सेविका अंजली तूपलोंढे यांच्या निधनाने हळहळ; आमदार प्रशांत बंब यांनी कुटुंबीयांचे घरी जाऊन केले सांत्वन

SCROLL FOR NEXT