दुष्काळाची तीव्रता कमी
करण्यासाठी समन्वय हवा
- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
ॲग्रोवन वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा प्रशासनाच्या कृषी विभागासह सर्वच यंत्रणांनी दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी समन्वयाने काम करावे. लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याने त्याचाही अंतर्भाव आपल्या एकूणच आराखडा व नियोजनात करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केल्या.
एमजीएम कृषी विज्ञान केंद्र गांधेली व छत्रपती संभाजीनगर कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेकडून शेतकरी, कृषी सखी व कृषी विभागाच्या गाव मंडळ तालुका स्तरावरील यंत्रणेच्या व्यक्तींसाठी शनिवारी (ता.३१) एक दिवसीय ‘दुष्काळजन्य परिस्थितीतील कृषी व्यवस्थापन’ विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. गौडा बोलत होते. त्यावेळी एमआयटीचे महासंचालक मुनीष शर्मा, एमजीएम कॅम्पस गांधेलीचे संचालक डॉ.के.ए. धापके, सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळाचे सुहास आजगावकर,आत्माचे प्रकल्प उपसंचालक तथा विभागीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अभयकुमार पडिले, मॅजिक इनक्युबेशन सेंटरचे संचालक आशिष गर्दे, लघुउद्योग भारतीचे उपाध्यक्ष रवी वैद्य आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, ‘‘एप्रिल मे मध्ये दुष्काळाची तीव्रता काय असेल ते लक्षात घेऊन काम करणे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी, चारा उपलब्धतेचे नियोजन करावे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये १००० जलतारा प्रकल्पांचे नियोजन करावे. प्रास्ताविक श्री. धापके यांनी केले. एमआयटीचे महासंचालक श्री शर्मा यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन वैशाली देशमुख यांनी, तर आभार एमजीएम कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक काकासाहेब सुकासे यांनी मानले. कार्यशाळेला जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी सखी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
...---फोटो B17753 ----
छत्रपती संभाजीनगर : कार्यशाळेचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी. यावेळी उपस्थित मुनिश शर्मा, डॉ. के ए. धापके, सुहास आजगावकर, आशिष गर्दे आदी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.