पुणे

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून बीडमधील दुष्काळी परिस्थितीचा आढावा

CD

उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून
दुष्काळी परिस्थितीचा आढावा

बीड जिल्ह्यात उपाययोजनांच्या दिल्या सूचना

बीड : बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीचा तसेच प्रशासकीय उपाययोजनांचा सविस्तर आढावा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शनिवारी (ता.१७) जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.

या बैठकीस आमदार प्रकाश सोळुंके, आमदार धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे आणि जिल्हा नियोजन अधिकारी शीला मिसाळ यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. बहुतांश पंचनामे पूर्ण होत आले असून अहवाल प्राप्त होताच नियमानुसार पुढील कार्यवाही गतिमान करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच पीक विमा प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणि अचूकता राखण्याचे निर्देश संबंधित कृषी व महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दुष्काळ आणि टंचाईच्या काळात नागरिकांनी अनावश्यक खर्च टाळावा, लग्न आणि वाढदिवसांवरील खर्च टाळावा तसेच सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करावे, असे आवाहन केले.

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून सध्या सुरू असलेल्या पाण्याच्या टँकर्सवर जीपीएस प्रणालीद्वारे नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या २२५ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पिण्यायोग्य पाण्याचा वापर कोणत्याही परिस्थितीत बांधकामासाठी करू नये आणि पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असेही स्पष्ट करण्यात आले.

याशिवाय जलस्रोतांचे पुनर्भरण, नदी-नाल्यांचे खोलीकरण, गाळ काढणे आणि विहिरींची दुरुस्ती यांसारखी जलसंवर्धनाची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी केल्या.जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने आत्तापासूनच पूर्वनियोजन करावे आणि शेतकऱ्यांना मुरघास, हायड्रोपोनिक्स तसेच अझोला चारा उत्पादनाचे प्रशिक्षण द्यावे, असे बैठकीत सांगण्यात आले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयी थांबून नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, तसेच शेतकऱ्यांशी संवाद वाढवून त्यांचे समुपदेशन करावे आणि त्यांना मानसिक आधार द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या.

पाणी, चारा आणि रोजगारनिर्मिती या सर्व बाबींवर समन्वयाने काम करून नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी प्रभावी नियोजन करावे, असेही आढावा बैठकीत स्पष्ट करण्यात आले.शेतकरी बांधवांना या नैसर्गिक संकटातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना तातडीने सावरण्यासाठी राज्य शासन सर्व स्तरांवर उपाययोजना करत असून प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे, असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Australia Hate Campaign : "ही तुमची संस्कृती आहे का?"; ऑस्ट्रेलियात भारतीय उत्पादनांवर वर्णद्वेषी स्टिकर्स, भारतीयांविरोधात द्वेष का वाढतोय?

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरण, उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराजवळ 'ही' झाडे लावणे मानले जाते शुभ; जाणून घ्या घरासाठी फायदेशीर असणारी रोपे!

Pune News : झाडणकाम वाढले, रस्ते स्वच्छ, उकिरडे झाले कमी

SCROLL FOR NEXT