पुणे

दुष्काळी मदतीचे पैसे खात्यावर जमा

CD

दुष्काळी मदतीचे पैसे
जमा होण्यास सुरुवात

दिवाळीआधी नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजार रुपये

अग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे दिवाळीच्या आधी राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर पाच हजार रुपये अग्रिम मदतीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारपासून (ता. २) ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे.
राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या मदतीची वाट न पाहता दिवाळी आधी पाच हजार रुपये मदत अग्रिम जमा करू असे जाहीर केले होते. यासाठी मागील आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत ७५०० रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असेल त्यांना ही मदत वितरित होण्यास सुरुवात झाली आहे.
या मदतीमुळे सणासुदीच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

३३ टक्क्यांपेक्षा अधिक
नुकसान झालेल्यांना दिलासा
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे, त्यांचे १०० टक्के नुकसान गृहीत धरून मदत दिली जाणार आहे. सध्या पाच हजार रुपये अग्रिम स्वरूपात दिल्यानंतर अंतिम मंजूर मदतीतून ही रक्कम वजा केली जाणार आहे. दुष्काळामुळे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटले असून, अनेक शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना सणासाठी तसेच रब्बी हंगामाशी संबंधित आवश्यक खर्चासाठी काही प्रमाणात आर्थिक आधार मिळणार आहे.

चौकट ----
राज्यातील ३०४ तालुक्यांत दुष्काळ; पंचनामे पूर्ण
दुष्काळाच्या कक्षेत एकूण ३७ हजार ४९६ गावांत पंचनामे करण्यात आले आहेत. पीक नुकसानीचे १०० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या क्षेत्राची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील एकूण १ कोटी ४१ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्राला दुष्काळाचा फटका बसल्याचे पंचनाम्यांतून स्पष्ट झाले आहे. या बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीचा प्रस्ताव सादर केला आहे. तत्पूर्वी राज्य सरकार मदत करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : तरुणांच्या आंदोलनांना ‘अराजक’ संबोधलं? तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवातील व्हिडीओवरून वाद

दिवाळीतच पर्यावरणाची आठवण येते का? दीया मिर्झा, नसीरुद्दीन शाह यांच्यावर भाजपचा हल्लाबोल...

Latest Marathi News Live Update : 20 वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

Gold-Silver Price Crash: धनत्रयोदशीपूर्वी सोनं-चांदीचे भाव कोसळले! उच्चांकापासून सोनं 43 हजारांनी, तर चांदी 2.43 लाखांनी स्वस्त

पतंजलीवर तुकाराम मुंढेंची धडक कारवाई, २,२७९ लिटर गाईचे तूप FDAकडून जप्त; चुकीचे लेबलिंग अन् भेसळीचा संशय

SCROLL FOR NEXT