AR126B01733
लोळेगाव (ता. शेवगाव) ः पावसाअभावी जळून गेलेले सोयाबीन पीक.
हिरवा चारा अन् पाण्याची टंचाई
तीन महिन्यांपासून पावसाची ओढ ः शेतकरी चिंतेत
अमरापूर, ता. १० : तीन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने पिकांची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. हिरवा चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर बैलांसह जनावरांच्या संगोपनाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा होणारा पोळ्याचा उत्साह यंदा मावळलेला दिसला.
गावागावांत बैलांची मिरवणूक काढून पोळ्याचा आनंद द्विगुणित केला जातो. मात्र, यंदाची परिस्थिती वेगळी आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप हंगामावर परिणाम झाला आहे. अनेक भागांत पिके संकटात आहेत. पाण्याअभावी जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना बाहेरून चारा विकत घ्यावा लागत आहे. चाऱ्याच्या वाढलेल्या किमती आणि पाण्याची टंचाईमुळे पशुधन सांभाळणे आर्थिकदृष्ट्या कठीण बनले आहे.
----------
पावसाची आस कायम
बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या मनात एकच अपेक्षा आहे, आकाश भरून यावे आणि समाधानकारक पाऊस पडावा. पाऊस झाला तर उशिरा का होईना, पिकांना जीवदान मिळेल, चाऱ्याची उपलब्धता वाढेल आणि पशुधनावरील संकट टळेल, असा आशावाद शेतकऱ्यांमध्ये जिवंत आहे.
------------
दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका पशुधनाला बसत आहे. शेतातील कडबा, हिरवा चारा आणि पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. काही शेतकरी उपलब्ध कडबा जपून वापरत असून, जनावरांना पाणी मिळावे यासाठी दूरवरून पाणी आणावे लागत आहे.
-श्रीकांत मिसाळ, शेतकरी, सामनगाव, शेवगाव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.