Drug supply in Pune and Pimpri Chinchwad efforts are needed to curb the supply of narcotics
Drug supply in Pune and Pimpri Chinchwad efforts are needed to curb the supply of narcotics sakal
पुणे

अमली पदार्थाचा पुरवठा रोखण्यासाठी संयुक्त प्रयत्न आवश्यक- संजय शिंदे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहरात अमली पदार्थाच्या पुरवठ्यास प्रतिबंध घालण्यासाठी सर्व यंत्रणांनी संयुक्तरित्या प्रयत्न करावेत. अमली पदार्थांचे उत्पादन, पुरवठा होत असल्यास वेळीच त्यावर कठोर कारवाई करावी, असे निर्देश पिंपरी-चिंचवडचे पोलिस सहआयुक्त संजय शिंदे यांनी दिले. जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी नियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या हिमानी दामीजा, अमली पदार्थ नियंत्रक विभागाचे विजय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक महादेव कनकवले, अन्न व औषध प्रशासन विभागाचे महेश कवटिकवार, राज्य उत्पादन शुल्कचे उपअधीक्षक युवराज शिंदे, टपाल विभागाचे व्ही. एस. कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, अमली पदार्थ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करावी. अमली पदार्थाचा पुरवठा रोखण्यासाठी कौशल्यपूर्वक नियोजन करावे. पुणे व पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रात अमली पदार्थांचे उत्पादन होत असल्यास प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी. अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या व त्यांना पुरवठा करणाऱ्यांवर तत्काळ कार्यवाही करा. अमली पदार्थाचे सेवन केल्याने बाधित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन होण्याच्यादृष्टीने त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात यावे. शाळा व महाविद्यालयात जनजागृती विषयक मोहीम राबवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT