Drugs Sakal
पुणे

Drugs : पुण्याला अमली पदार्थांचे गालबोट! कारवाई ढिली, विळखा घट्ट

पोलिसांनी २०२१ मध्ये शहरात अडीच कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पोलिसांनी २०२१ मध्ये शहरात अडीच कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले होते. ड्रग माफिया ललित पाटील याच्याविरुद्ध आणि त्यानंतर केलेल्या कारवाईत मे २०२४ अखेर हा आकडा तब्बल तीन हजार ६७६ कोटींवर पोहोचला आहे. त्यावरून शहरातील ड्रग्ज प्रकरणाची दाहकता स्पष्ट होते. ‘स्ट्रीट क्राइम’, सायबर गुन्हेगारीसह अमली पदार्थांची तस्करी रोखण्याचे पुणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

या मुद्यांवर काही लोकप्रतिनिधींचा अपवाद वगळता इतरांनी ‘ब्र’ काढलेला नाही. ड्रग्जच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला सुरक्षित बाहेर काढावे लागणार आहे. त्यासाठी स्थानिक आमदारांनी हा प्रश्न विधिमंडळात गांभीर्याने मांडण्याची आणि त्यावर राज्य सरकारने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.

शिक्षणाचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर आयटी हब म्हणून आंतरराष्ट्रीय पटलावर नावारूपास आले. परंतु हेच पुणे शहर ड्रग्ज माफियांच्या विळख्यात अडकत चालले आहे. शहरात अमली पदार्थ विक्रीच्या किरकोळ घटना यापूर्वीही घडत होत्या.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर १ ऑक्टोबर २०२३ रोजी दोन कोटींचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले होते. तेथून सुरू झालेला प्रवास फेब्रुवारी २०२४ मध्ये कुरकुंभच्या कारखान्यापर्यंत दोन हजार कोटींपर्यंत पोहोचला. यावर्षी मे २०२४ अखेर पोलिसांनी तीन हजार ५८१ कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे.

दम भरला तरी ‘दम मारो दम’

पोर्श मोटार अपघात प्रकरणानंतर पोलिसांनी पब-बारवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधी मोहीम सुरूच आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सराईत गुन्हेगार आणि ड्रग पेडलरची आयुक्तालयात हजेरी घेऊन दम भरला होता. परंतु शहरात वाहनांची तोडफोड, गुंडगिरी, पब-बार, हुक्का पार्लरमध्ये अमली पदार्थांचे सेवन सुरूच आहे.

पबवर फिरवा बुलडोझर

पुण्यातील अनधिकृत पब-बारवर बुलडोझर फिरवा, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिस आयुक्तांना सोमवारी दिला. पोर्श अपघात प्रकरणानंतर पोलिसांनी अनधिकृत पब-बारची यादी महापालिका प्रशासनाला पाठवली होती. त्यापैकी काही पब-बारवर बुलडोझर फिरविण्यात आले.

परंतु महिन्यानंतर राज्य उत्पादन शुल्क आणि महापालिकेकडून ही कारवाई थंडावली होती. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पब-बार आणि हुक्का पार्लर सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ही कारवाई गतीने होईल, असे अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT