Lalit Patil  Esakal
पुणे

Pune Crime : पुणे पोलिसांच्या हातून थोडक्यात निसटला होता ललित पाटील

अमली पदार्थ तस्कर ‘मोस्ट वाँटेड’ ललित पाटील याला पकडण्यासाठी पुणे, मुंबई आणि नाशिक पोलिसांची पथके मागावर होती.

अनिल सावळे -@AnilSawale

पुणे - अमली पदार्थ तस्कर ‘मोस्ट वाँटेड’ ललित पाटील याला पकडण्यासाठी पुणे, मुंबई आणि नाशिक पोलिसांची पथके मागावर होती. अखेर मुंबई पोलिसांनी त्याला चेन्नईतून अटक केली. परंतु त्यापूर्वी ललित पुणे पोलिसांच्या पोलिसांच्या हातून थोडक्यात निसटल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे पोलिसांनी ललितचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक विलास बलकवडे या दोघांना भारत-नेपाळ सीमेवरून अटक केली होती. त्यानंतर पोलिस भूषणच्या माध्यमातून ललितचा मोबाईल ट्रॅक करीत लोकेशन घेत होते. परंतु भूषणला अटक केल्याची बातमी प्रसिद्धिमाध्यमांत झळकली अन॒ ललित मोबाईल बंद करून तेथून पसार झाला.

चाकण येथील अमली पदार्थ विक्री प्रकरणात ललितची येरवडा कारागृहात रवानगी केली होती. त्यानंतर ललित ससून रुग्णालयात चार जूनपासून ससूनच्या विशेष वॉर्डमध्ये ‘शाही’ उपचार घेत होता. दरम्यान, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून परिसरातून सव्वादोन कोटींचे मेफेड्रॉन जप्त केले आणि तस्करीच्या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. ललितचा साथीदार सुभाष मंडल आणि कॅन्टीनमधील कर्मचारी रौफ रहीम शेख या दोघांना अटक केली.

परंतु दुसऱ्या दिवशी सायंकाळी वैद्यकीय तपासणीसाठी नेताना ललित पसार झाला होता. ललित आणि भूषण हे दोघे मुंबईच्या साकीनाका पोलिस ठाण्यातही दाखल एका गुन्ह्यात आरोपी आहेत. मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यांनी नाशिकमधील कारखान्यातून कोट्यवधी रुपयांचा मेफेड्रॉनचा साठा जप्त केला.

दुसरीकडे पुणे पोलिसांची विविध पथके महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसह आंध्र प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांत ललितला शोधत होती. त्याचा भाऊ भूषण आणि अभिषेक बलकवडेला भारत-नेपाळ सीमेवरील बाराबंकीमधून अटक केली. त्यानंतर पोलिस गुप्तता पाळत ललितच्या मागावर होते.

भूषणच्या माध्यमातून पोलिस ललितच्या जवळपास पोचले होते. परंतु मुंबई पोलिसांनी नाशिकमधून अटक केलेल्या आरोपीच्या माध्यमातून ललितला गाठले.

भागकर जाएगा कहां?

ससूनमधून ललित पसार झाल्यानंतर पोलिसांवर टीकेची झोड उठली होती. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन पोलिस अधिकाऱ्यांसह नऊ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. ललितला कधी अटक करणार? असे विचारले असता, रितेश कुमार यांनी पुणे, मुंबई आणि नाशिक पोलिसांच्या टीम समन्वयाने त्याचा शोध घेत आहेत. ‘वह भागकर जाएगा कहां ?’असे म्हणत त्याला लवकरच अटक होईल, असे सांगितले होते.

अमली पदार्थ तस्करीतील आरोपींना अटक केल्यानंतर आरोपपत्र दाखल केले जाते. परंतु काही आरोपी जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा अमली पदार्थांची तस्करी सुरू करतात. ललित पाटीलच्या प्रकरणात आरोपींकडून पोलिसांना माहिती मिळत आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मदतीने पोलिस सखोल तपास सुरू असून, अमली पदार्थ तस्करीचे संपूर्ण नेटवर्क उध्वस्त करण्यात येईल.

- रितेश कुमार, पोलिस आयुक्त

घटनाक्रम -

४ जून २०२३ - ललित पाटील ससून रुग्णालयात दाखल.

१ ऑक्टोबर २०२३ - पुणे पोलिसांकडून ससून रुग्णालय परिसरात छापा, सव्वा दोन कोटींचे मेफेड्रॉन जप्त - सुभाष मंडल आणि रौफ शेख या दोघांना अटक.

२ ऑक्टोबर - ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार

६ ऑक्टोबर- ललितचा साथीदार दत्तात्रेय डोके याला अटक

४ ते ७ ऑक्टोबर- पुणे पोलिसांनी नाशिकमधून अभिषेक बलकवडेच्या घरातून तीन किलो सोने जप्त केले.

९ ऑक्टोबर- भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेला नेपाळ सीमेवरून अटक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT