दारू पिऊन गाडी
चालवणाऱ्यांवर कारवाई
कऱ्हाड, ता. १७ ः शहरासह परिसरात मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्या सहा जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली, तसेच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई केली.
पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी आज मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्यांवर धडक कारवाईची मोहीम राबवली. संबंधितांची तपासणी करून जे वाहनचालक मद्यप्राशन करून वाहने चालवत होते, अशा संबंधित सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचबरोबर वाहने कोठेही लावून वाहतुकीस अडथळा करणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. वाहतूक पोलिसांनी त्याचा विचार करून शहरात कृष्णा नाका, उपजिल्हा रुग्णालय, प्रीतिसंगम घाट परिसर, बसस्थानक परिसर, कोल्हापूर नाका तसेच विजयदिवस चौक परिसर आदी ठिकाणी संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. त्याचबरोबर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची कागदपत्रे तपासून ज्यांच्याकडे आवश्यक परवाना, कागदपत्रे नसणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.