पुणे

आसू येथे मद्यधुंद अवस्थेत गोंधळ; डायल ११२ वर खोटा कॉल केल्याप्रकरणी गुन्हा ब्रीथ अ‍ॅनालायझर चाचणीत अल्कोहोलचे प्रमाण ५५० एमजी/१०० मिली आढळले

CD

आसूमध्ये एकाचा मद्यधुंद अवस्थेत गोंधळ

डायल ११२ वर खोटा कॉल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

दुधेबावी, ता. २१ : आसू (ता. फलटण) येथे मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने आरडाओरडा करून गोंधळ घालणे, तसेच डायल ११२ वर खोटा कॉल केल्यावरून अजिंक्य राजेंद्र फुले (वय ३५, रा. आसू, ता. फलटण) याच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आसू येथील प्रगती चिरमे यांनी शेजारी मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याने त्रास होत असल्याबाबत डायल ११२ वर कॉल केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी गेले असता, तक्रारदार यांच्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर अजिंक्य फुले हा मद्यधुंद अवस्थेत मोठमोठ्याने आरडाओरडा करताना आढळल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
तसेच प्रगती चिरमे यांच्या मोबाईल क्रमांकावरून डायल ११२ वर खोटा कॉल करत असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संबंधित व्यक्तीकडे मद्यपानाचा परवाना आहे का, अशी विचारणा केली असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात आणून ब्रीथ अ‍ॅनालायझर मशिनद्वारे तपासणी केली. या तपासणीत अल्कोहोलचे प्रमाण दर्शविणारा अहवाल प्राप्त झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली.
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून आरडाओरडा करणे, तसेच आपत्कालीन हेल्पलाइनचा गैरवापर करणे यामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो. अशा प्रकारांबाबत पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाते.

-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘तुम्ही Gen Z नाही!’ दिल्ली हायकोर्टानं सौरभ दास अन् आशुतोष रांका यांना सुनावलं; फ्रान्समधील जाळपोळीच्या घटनांचाही केला उल्लेख...

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

‘या घरात तुझ्या कार्यासाठी येईन असं वाटलं नव्हतं…’ नाना पाटेकरांच्या पुतण्याची पोस्ट चर्चेत; फार्म हाऊसमधील फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update : चार ते पाच महिन्यांत देशात काहीतरी मोठं घडणार, राज ठाकरेंचा दावा

Shark Tank USA: भारतीय तरुणाचा अमेरिकेत डंका! फक्त 2 चमच्यांच्या आयडियासाठी मिळाली ₹3.3 कोटींची ऑफर

SCROLL FOR NEXT