Drunken Husband killed his wife and Pretended as committed Suicide in Pimpri.jpg
Drunken Husband killed his wife and Pretended as committed Suicide in Pimpri.jpg 
पुणे

दारुच्या नशेत पतीने केला पत्नीचा खून; आत्महत्येचा बनाव उघड

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : राहत्या घरी दारुच्या नशेत पत्नीचा खून करुन तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचणाऱ्या पतीला हिंजवडी पोलीसांनी अटक केली आहे. पत्नीच्या मृत्यूची नातेवाईक आणि पोलीसांना विसंगत माहिती दिल्याने त्याचा बनाव उघडकीस आला. 

पुणे : वारज्यात गटाराच्या चेंबरमध्ये सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह 

विजय विठ्ठल कहाळे (वय 28, रा.विघ्नहर्ता बिल्डिंग, कर्नाटक बॅंकेसमोर, बावधन बुद्रूक) असे त्या आरोपी पतीचे नाव आहे. अयोध्या विजय कहाळे (वय 22, रा. बावधन बुद्रूक, मूळ रा.परभणी) असे मयत पत्नीचे नाव आहे. 

‘एचआयव्ही’वरील औषधांचा तुटवडा 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कहाळे दारु पिऊन घरी आला होता. त्यावरुन त्याच्यात आणि अयोध्या यांच्यात भांडण झाले. त्यामुळे, चिडून जाऊन कहाळे याने त्यांच्या कपाळावर टोकदार वस्तू मारुन जखमी केले. नंतर, दोरीच्या मदतीने त्यांचा गळा आवळून खून केला. मात्र, पोलिसांना त्याने पत्नीने ओढणीने गळफास घेतल्याचे सांगितले. तसेच घरात पडलेले रक्त पुसून घेऊन तिला स्वतःच उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.

#GreenPune आयटीयन्सची ‘सायकल टू वर्क’ चळवळ 

नातेवाईकांना त्याने वेगळीच माहिती दिली. त्यामुळे, पोलिसांना त्याचा संशय आला. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने वरील प्रकार केल्याचे समोर आले.
या प्रकरणी, त्र्यंबक उमराव बोबडे (वय 39, रा.मु.पो.टाकळी बोबडे, जि.परभणी) यांनी पोलीसांत फिर्याद दिली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

Pune-Delhi Flight : विमानाला धडक, चौकशीसाठी पथक;‘डीजीसीए’चे तीन सदस्य पुण्यात दाखल

VIDEO: "निवडणूक संपली, प्रचार संपला!"; रितेश आणि जिनिलियाचा व्हिडीओ पाहून खळखळून हसाल

SCROLL FOR NEXT