पुणे

''डायल ११२'' वर खोटी तक्रार महागात

CD

आळेफाटा, ता. २३ : मद्याच्या नशेत पोलिसांच्या ‘डायल ११२’ हेल्पलाइनवर मारहाणीचा खोटा बनाव रचून शासकीय यंत्रणेची दिशाभूल करणाऱ्या तरुणाला आळेफाटा पोलिसांनी अटक केली. हर्षल प्रकाश पाटील (वय ३५, रा. चहार्डी, जि. जळगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. २०) पहाटे हर्षलने पोलिसांना दूरध्वनी करून खासगी बसचालकाकडून मारहाण होत असल्याची तक्रार केली. मदतीसाठी गस्ती पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले, मात्र तिथे कोणीही आढळले नाही. त्यानंतर त्याने पुन्हा दूरध्वनी करून पोलिसांना चुकीची माहिती दिली. संशय आल्याने पोलिसांनी त्याला आळेफाटा बसस्थानकाजवळ गाठले. तिथे त्याने पोलिसांशी हुज्जत घालत रस्त्यावर गोंधळ घातला. त्यानंतर पोलिसांनी त्याला थेट आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन डॉक्टरांसमोर उभे केले. वैद्यकीय तपासणीत त्याने मद्याचे अतिसेवन केल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरांनी पोलिसांच्या हाती दिले. दारू पिऊन विनाक्रमांक वाहन चालवणे आणि पोलिसांना खोटी माहिती देऊन शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विश्‍वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पोपट कोकाटे पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: गौतमी पाटीलने घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT