DSK case should be disposed of immediately Depositors file petition in Mumbai High Court 
पुणे

डीएसके प्रकरण त्वरित निकाली लावावे ; ठेवीदारांकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल 

सकाळवृत्तसेवा

पुणे : बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांच्याकडे गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हे प्रकरण त्वरित निकाली काढावे, डीएसके यांच्या मालमत्तेचा लिलाव करून गुंतवणूकदारांना पैसे द्यावे, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अॅड. चंद्रकांत बिडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. चांगल्या परताव्याचा आमिषाने डीएसके यांनी गुतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी डीएसके यांना त्याच्या कुटुंबियांसह अटक करण्यात आली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. याबाबत अॅड.  बिडकर यांनी 15 फेब्रुवारी रोजी येथील न्यायालयातील खटला लवकर निकाली निघावा म्हनुन अर्ज केला होता. मात्र अद्याप त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे ऍड. बिडकर यांनी गुंतवणूकदारांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

गुतवणूकदारांचे एक हजार 153 कोटी रुपये तात्काळ देण्यात यावे. या प्रकरणाचा निपटारा लवकरात लवकर करावा. ड्रीम सिटी प्रकल्प म्हाडाला देऊन त्यातून येणाऱ्या रकमेतून ठेविदारांचे पैसे परत करावे, तसेच सरकारने जप्त केलेल्या डीएसके यांच्या मालमत्तेचा ताबा अद्याप मिळालेला नसल्याने त्याचा लिलाव करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या मालमत्ता ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे, असे अॅड. बिडकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : अमेरिका पाकिस्तानला मदत का करते? माजी CIA एजंटकडून स्वत:च्याच सरकारची पोलखोल; देशाला हादरवणारी माहिती समोर...

Divyang Niradhar Yojana: मोठी घोषणा! निराधार लाभार्थींना आता मिळणार महिन्याला 2500 रुपये; वाचा काय आहेत अटी?

Latest Marathi News Live Update: लहान मुलाचा जीव घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद

Brazil Drug Bust : ट्रकच्या टायरमध्ये लपवला होता ३५० कोटींचा माल, चाणाक्ष कुत्र्यामुळे मोठे रॅकेट उघड, नेमकं काय घडलं?

राज्यात वीज दर कमी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमाफीवरही बोलले

SCROLL FOR NEXT