DSK Supreme Court to run all cases in one place 
पुणे

सर्व खटले एकाच ठिकाणी घ्या; DSK सर्वोच्च न्यायालयात

सनील गाडेकर

पुणे : बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या सर्व दाव्यांची सुनावणी एकाच न्यायालयात व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणात सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

मुंबई किंवा पुण्यातील विशेष न्यायालयात सर्व खटल्यांची सुनावणी घेण्यात यावी. याचिकेवर निकाल होत नाही तोपर्यंत जामीनावर सुटका करावी, अशी मागणी करणारी याचिका डीएसके यांचे वकील प्रतीक राजोपाध्ये आणि अॅड. आशिष पाटणकर यांनी दाखल केली आहे. डीएसके, त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आणि त्यांच्या विविध कंपन्यांवर ठेवीदारांची फसवणूक व इतर विविध कलमांनुसार देशात सुमारे ४५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. या सर्व प्रकरणांची स्वतंत्र सुनावणी झाल्यास प्रत्येक पोलिस ठाणे व न्यायालयात हजर होणे मुश्‍कील आहे. तसेच गुन्ह्याची व्याप्ती देखील मोठी आहे. त्यामुळे एकाच न्यायालयात सुनावणी झाल्यास न्यायालयाचा वेळ वाचेल, असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

अन्यथा डीएसकेंची पोलिस ठाण्याची वारी सुरू होणार :
डीएसके यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या ४५० च्या पुढे आहे. त्यामुळे त्यांना एका पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात जामीन मिळाला तर दुसऱ्या पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात अटक होऊ शकते. तसेच वेगवेगळ्या न्यायालयात दाखल गुन्ह्यात हजर व्हावे लागेल. त्यामुळे सर्व प्रकरणांची स्वतंत्र कारवार झाल्यास डीएसके यांची पोलिस ठाण्यांची वारी सुरू होण्याची शक्यता आहे.

याबाबत दाखल आहेत गुन्हे :
- ठेवीदारांची फसवणूक
- फुरसुंगी येथील जमीन खरेदी घोटाळा
- पैशांची हेराफेरी
- व्हॅट भरला नाही
- सदनिकेचा वेळेत ताबा दिला नाही
- रक्कमेच्या परताव्यासाठी दिलेले धनादेश वटले नाहीत
- ग्राहक आयोगातील दावे
- सदनिका धारकांनी महारेरात केलेल्या तक्रारी
- आर्थिक गुन्हे शाखेतील तक्रारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत ! 'एफडीए'च्या मोहिमेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल; मुंबईतील कारवाईची जगभर होतेय चर्चा

IND vs WI T20I: वेस्ट इंडिजच्या ट्वेंटी-२० संघात बदल; भारताला झोडणाऱ्या खेळाडूची एन्ट्री, तिसरी वन डे जिंकल्यावर आलाय कॉन्फिडन्स...

'दृश्यम'च्या पहिल्या दोन भागात दिसला पण तिसऱ्यात नाही, मराठी अभिनेत्याला वाटतंय वाईट; म्हणतो - गायतोंडेने...

Latest Marathi News Live Update : नागपूर पदवीधर मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलली; वंजारी, कोहळे यांच्यासह कराळे-सोलेही मैदानात?

Mumbai News: 'ती' चारचाकी आयात नव्हे! उच्च न्यायालयाचे सीमा शुल्क विभागाला आदेश

SCROLL FOR NEXT