DSK 
पुणे

डिएसकेंच्या महागड्या अन् अलिशान गाड्यांचा होणार लिलाव!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या 20 पैकी 13 गाड्याच्या लिलावाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. बीएमडब्ल्यु, पोर्शे, टोयाटो कॅमरी, एमव्ही ऑगस्टा यांसारख्या कोट्यावधी रुपये किंमतीच्या  अलिशान गाड्या डिएसकेंच्या ताफ्यामध्ये होत्या. 

डीएसके व त्यांच्या कुटुंबीयांनी गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांच्या व कुटुंबीयांनी केलेले अनेक गैरव्यवहार पुढे आले होते. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रारंभी डीएसके यांच्या मालमत्ता जप्त करण्यावर प्राधान्य दिले होते. त्यानंतर पोलिसांनी डीएसकेंची चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे महागड्या व अलिशान गाड्या असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार पोलिसांनी फेब्रुवारी व मार्च 2018 मध्ये त्यांच्याकडील 20 अलिशान गाड्या जप्त केल्या होत्या. 

पांढऱ्या शुभ्र रंगाच्या दोन 'बीएमडब्ल्यू', एक लालभडक 'पोर्शे', दोन टोयाटा, या चारचाकी गाड्यांसह एमव्ही ऑगस्टा ही दुचाकी अशा पाच कोटींच्या गाड्या प्रारंभी जप्त केल्या. त्यानंतर दोन इनोव्हा, एक इटीऑस, एक कोरेला अल्टी व एक क्वालीस अशा 20 गाड्या पोलिसांनी जप्त करुन शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या परिसरात ठेवण्यात आल्या आहेत. डीएसकेंच्या काही आलिशान गाड्यांना 1001 हा क्रमांक आहे. या क्रमांकास व जगातील आलिशान गाड्यांना डीएसके कुटुंबीयांकडून अधिक पसंती दिली. 

दरम्यान, डिएसके यांच्याकडील अलिशान व महागड्या गाड्या एकाच ठिकाणी पडून असल्याने त्या खराब होऊ लागल्या होत्या. त्यामुळे या गाड्यांचा तातडीने लिलाव करुन देण्यात यावा, अशी मागणी पोलिसांकडून न्यायालया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

सिरियलमध्ये आली देशभक्त नागिण! इस्रोच्या रॉकेटला केला सलाम, नेटकऱ्यांनी एकता कपूरला केलं ट्रोल

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT