DSK 
पुणे

डीएसके प्रकरण : फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट कोर्टात दाखल करा; वकिलांनी केली मागणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यातील अंतिम फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट न्यायालयात दाखल करण्यात यावा, अशी मागणी डीएसके यांच्या वकिलांनी केली आहे. या बाबत आदेश होऊन गेली दोन वर्ष उलटल्यानंतरही अद्याप रिपोर्ट दाखल करण्यात आलेला नाही.

डीएसके यांचे वकील ऍड. प्रतीक राजोपाध्ये, ऍड. आशिष पाटणकर यांनी शुक्रवारी (ता.९) ही मागणी केली आहे. विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. डीएसके यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट महत्त्वाचा असल्याचे पोलिस आणि सरकारी वकिलांकडून सांगण्यात येते आहे. मात्र, गेली दोन वर्षे वारंवार मागणी करूनही हा रिपोर्ट न्यायालयासमोर दाखल करण्यात आलेला नाही.

डीएसके यांनी गुंतवणूकदारांची कशी फसवणूक केली, याची माहिती या रिपोर्टमध्ये असल्याचे सांगण्यात येते आहे. त्यामुळे हा रिपोर्ट दाखल केला नाही म्हणून तपास अधिकाऱ्यांवर चुकीची माहिती दिल्याप्रकरणी कारवाई करावी, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. आम्ही दाखल केलेल्या अर्जाची दखल घेऊन पुढील सुनावणीच्या वेळी रिपोर्ट दाखल करण्यात यावा, असे तोंडी निर्देश न्यायालयाने दिल्याची माहिती ऍड. राजोपाध्ये यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: ठाकरेंच्या बंडखोर खासदारांची गुप्त बैठक कॅमेऱ्यात; पहिला फोटो होताच राजकीय वर्तुळात खळबळ, मास्टरमाईंडही समोर

Latest Marathi Live Updates: सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र एकीकरण समितीला कर्नाटकात अडवले, ठिय्या आंदोलन

MSEB Share Market : महावितरण शेअर मार्केटमध्ये येणार, खासगीकरणाकडे वाटचाल; राज्य सरकारचा प्रस्ताव, आयपीओ ओपन करण्यावरून नवा वाद

IPL 2027 Trade: रिषभ पंतला पुन्हा दिल्ली कॅपिटल्समध्ये आणण्यात 'दोन' मोठ्या व्यक्तींचा हात; KKR ही होते मैदानात, पण LSGच्या हट्टामुळे Deal फिसकटली

BEST Strike : मुंबईकरांचे हाल... बेस्ट संप दुसऱ्या दिवशीही सुरूच; मेट्रो, रेल्वेत गर्दीच गर्दी

SCROLL FOR NEXT