पुणे

दुधेबावी फेस्टिव्हलमध्ये १० नोव्हेंबरला गुणवंतांचा सन्मान सोहळा यूपीएससी, एमपीएससीतील यशस्वितांना ‘यशवंत’ पुरस्काराने गौरविणार; दुधेबावी भूषण व आदर्श माता-पिता पुरस्कारांचेही वितरण

CD

दुधेबावी फेस्टिव्हलमध्ये
उद्या पुरस्काराचे वितरण

दुधेबावी, ता. ८ : दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दुधेबावी फेस्टिव्हलमध्ये मंगळवारी (ता. १०) यूपीएससी, एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या यशस्वी उमेदवारांना ‘यशवंत’ पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी दिली.
जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा होणार असून, महसूल विभागाच्या उपसचिव अश्विनी यमगर-देशमुख अध्यक्षस्थानी राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून मंत्रालयातील कृषी विभागाचे उपसचिव गणेश कचरे, गोंदियाच्या उपजिल्हाधिकारी ज्योती कांबळे, धाराशिवच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे-मुळीक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, फलटणचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे, जिल्हा सहकार उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक, फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव आणि ‘चांडाळ चौकडीच्या करामती’ फेम अभिनेते रामभाऊ जगताप उपस्थित राहणार आहेत.
यावेळी यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेले सोहम नामदेव शेंडे व विनायक शंकर धुमाळ, पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झालेले विशाल नारायण वाघ, निखिल हनुमंत घनवट व अर्जुन आण्णा हाके, कक्ष अधिकारीपदी निवड झालेले शुभम संभाजी ढोक, मंडल कृषी अधिकारीपदी निवड झालेल्या प्राजक्ता अनिल नाळे, राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया संपत आडके, महसूल सहाय्यकपदी निवड झालेले तुषार जयवंत जाधव, रोहित नारायण कदम व तेजश्री आनंदराव गावडे, प्रशासकीय अधिकारीपदी निवड झालेल्या रांची हणमंत बनकर आणि कनिष्ठ अभियंतापदी निवड झालेल्या दूर्वा सतीश निंबाळकर यांचा ‘यशवंत’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात सातारा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश घुले यांच्या हस्ते ‘दुधेबावी भूषण’ पुरस्काराचे वितरण होणार आहे, तसेच आदर्श माता-पिता पुरस्काराचे वितरण फलटणचे गटशिक्षणाधिकारी सी. जी. मठपती यांच्या हस्ते होणार असून, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विचार मंच, चौधरवाडीचे अध्यक्ष तुकाराम कोकाटे व पत्रकार मनोज पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Statement by MP Omraje Nimbalkar : "दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर..."; ठाकरेंना सोडचिठ्ठी देणाऱ्या बड्या खासदाराच्या वक्तव्याने खळबळ!

U19 IND vs U19 PAK: रोमहर्षक सामन्यात भारताचा पराभव! हमजा जहूरच्या पाकिस्तानचा विजय, आता Asia Cup सेमीफायनलसाठी समीकरण काय?

MPSC Success Story: सहा वेळा अपयश, तरी जिद्द सोडली नाही! नांदेडचा ओमकेश झाला क्लास वन अधिकारी; आईच्या मांडीवर डोकं ठेवताच अश्रू अनावर

Latest Marathi News Live Update: : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्यांग बांधवांसोबत साजरी केली आनंददायी दिवाळी; 'नंदनवन' बंगल्यावर फराळ वाटप करत दिल्या शुभेच्छा

Siddi Community Marathi Song Viral Video : आफ्रिकन लूक अन् अस्सल मराठी गावरान ठसका; माठावर ठेका धरत सिद्दी तरुणांनी गायले ‘हिरो होंडा’ गीत

SCROLL FOR NEXT