due to Nail Belt a dog escaped from the attack of the leopard 
पुणे

गळ्यातील पट्ट्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यातून वाचला 'टायगर

नवनाथ भेके, निरगुडसर

निरगुडसर : गळ्यात चुकांचा पट्टा असल्याने बिबटयाने हल्ला करुनही टायगर नावाच्या कुञ्याचे प्राण वाचल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील पांढरीवस्ती (खडकी) येथील सिताराम तुकाराम बांगर यांच्या घरासमोर सोमवार (ता.१९) रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आंबेगाव तालुक्यातील खडकी, थोरांदळे, चांडोली, नागापुर, वळती, गांजवेवाडी, नागापुर, जवळे, भराडी, निरगुडसर परिसरात बिबटयाचा वावर मोठया प्रमाणात वाढला आहे अनेक ठिकाणी बिबटयाचे दर्शन होत आहेत तर पाळीव प्राण्यावर हल्ले वाढले आहेत.खडकी-जवळे रस्त्यावर असलेल्या पांढरीवस्तीवर सिताराम तुकाराम बांगर यांचे घर आहे. त्यांच्याकडे टायगर व डॅालर ही दोन पाळीव कुञी असुन दोन्ही कुञ्यांचा बिबटयापासुन बचावासाठी सुरक्षितता म्हणुन गळ्याचा पट्टा चुका लावून बनवण्यात आला आहे. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बिबटयाने घराबाहेर शेडमध्ये बसलेल्या कुञ्यांवर हल्ला करुन मान पकडली परंतु मानेला असलेल्या चुकांच्या पट्टयामुळे बिबटयाला मान पकडता आली नाही. कुञ्याचा मानेला दोन दात लागले आहे, परंतु जीव वाचला आहे. कुञ्याचा किंचाळण्याचा आवाजाने हे कुटुंब जागे झाले परंतु भीतीपोटी बाहेर आले नाही. दिवस उगवल्यावर ते बाहेर आले. परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळुन आले आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

मागील अनेक दिवसांपासुन बिबटयाचा वावर वाढल्याने परीसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी सीताराम बांगर यांनी वनविभागाला घटनेची माहीती दिली असुन तातडीने पिंजरा लावण्याची मागणी बांगर यांनी केली आहे.

थोरांदळे गावातील उपळी मळा आणि फुटाणे मळा येथे बिबट्याची जोडी दोन पिल्लांसह फिरताना अनेक नागरिकांनी पाहीले आहे.  या परिसरातील कुत्रे आणि शेळ्या मेंढ्या बिबटयाने हल्ला ठार मारले आहे. धोंडीभाऊ कारगल या धनगराची शेळी ठार मारल्याची घटना घडली आहे. तसेच नाथा टेमगिरे यांच्या शेतात चरत असताना शेळ्या ठार मारली असुन यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही तरी थोरांदळे येथे पिंजरा लावण्याची मागणी पुणे जिल्हा ग्राहक पंचायतीचे नितीन मिंडे यांनी केली आहे

कुञ्यांच्या मानेवर चुकांचा पट्टा फायदेशीर.....
बिबटयाच्या हल्ल्यात पाळीव प्राण्यावर हल्ले होऊन त्यांचे जीव जात आहे असे अनेक प्रकार भराडी, शिंगवे आदी भागातील सीसीटिव्हीत कैद झाले आहे. यामध्ये बिबटया हल्ला करताना पहिले मानच पकडत असल्याने त्यांचा जीव जात आहे. शेतकऱ्यांचा घर, शेतीचे राखण करणारा कुञा आता बिबटयाकडून लक्ष होत असून राखणदार गायब होत चालला आहे. मानेभोवती असलेल्या चुकांच्या सुरक्षेमुळे पांढरीवस्तीवरील टायगर नावाचा कुञा हल्ला करुनही वाचला. त्यामुळे कुञ्यांच्या मानेवर चुकांचा पट्टा फायदेशीर ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT