pune.jpg 
पुणे

Pune Rains : दुसऱ्यांचे प्राण वाचविणारा 'तो' प्रवाहात वाहून गेला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : घराबाहेरील आरडाओरडा ऐकून धर्मानाथ, त्याचा भाऊ गोलू दोघेही बाहेर आले, समोरील घराच्या खिडक्‍यांमधून बाहेर पडणारे पाणी पाहून इतरांसमवेत तेही तिकडे धावले, त्यांनी पाच मुलांसह 10-15 जणांचे प्राण वाचविले. माघारी परतले, तोपर्यंत धर्मानाथच्या घरातही पाण्याचा लोंढा गेला होता, त्यामुळे धर्मानाथने रस्सीच्या सहाय्याने पत्नी, दोन मुलांना वाचविले आणि ते स्वतः बाहेर पडू लागले, इतक्‍या लोकांचे प्राण वाचविणाऱ्याला पाण्याच्या लोंढ्याच्या रुपाने आलेल्या नियतीला मान्य नव्हते, पाण्याचा प्रवाह त्यांना घेऊन गेला आणि ते मृत्युच्या कवेत कायमचे विसावले ! 

मुळचे उत्तर प्रदेशाच्या देवरिया जिल्ह्यातील बमनोलीकला या गावचा 25 वर्षीय धर्मानाथ कुमार व त्याचा भाऊ गोलुप्रसाद कुमार यांनी अडीच वर्षांपुर्वी पुण्याची वाट धरली. कोंढवा खुर्द येथील आंबेडकरनगर वसाहतीमध्ये एका चाळीतील छोट्याशा खोलीमध्ये धर्मानाथ, त्याची पत्नी प्रमिलादेवी, मुले राज व मनसु व भाऊ गोलुप्रसाद वास्तव्य करीत होते. धर्मानाथ बिगारी काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविता होता. दररोजच्याप्रमाणे तो दिवसभर काबाडकष्ट करुन रात्री घरी आला. कुटुंबासमवेत जेवण करुन ते बसले होते. तेवढ्यात बाहेर लोकांचा आरडाओरडा सुरू झाला. धर्मानाथच्या घरासमोरील एका घराच्या खिडकीतूून पाणी वाहत होते. त्यामुळे धर्मा व गोलू दोघेही तिकडे धावले. इतर नागरीकांच्या मदतीने त्यांनी पाण्यात अडकलेल्या 5 मुलांसह 10-15 जणांची सुटका केली. त्यानंतर ते माघारी परते. तोपर्यंत रस्त्यावरुन आलेला पाण्याचा लोंढा धर्माच्या घरासह अन्य चार खोल्यांमध्ये शिरला. 

आता मात्र स्वतःच्याच कुटुंबाला वाचविण्यासाठी धर्मा व गोलुने सुरूवात केली. धर्मा रस्सी घेऊन पाण्याच्या प्रवाहात पलिकडे खोलीमध्ये पोचला. त्यानंतर दुसऱ्या बाजुला भावाकडे रस्सीचे एक टोक देऊन त्यांनी पत्नी व दोन मुलांना तेथून सुखरुप बाहेर काढले. त्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकले. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह त्याच्या घराच्या दिशेने झेपावला. त्यातुन बाहेर पडण्यासाठी त्यांनी धडपड सुरू केली, घराच्या भिंती, दरवाजाला, गोलुने टाकलेल्या रस्सीला पडकण्याचा प्रयत्न केला. मात्र ही धडपड व्यर्थ्य ठरली. पाण्याचा प्रवाह धर्मानाथला आपल्यासमवेत वाहून घेऊन गेला. संपुर्ण रात्र, दुसऱ्या दिवसाची सकाळ त्याला शोधण्यामध्ये गेली. गुरूवारी सकाळी साडे अकरा वाजता घरापासून तब्बल चार किलोमीटर लांब लुल्लानगर परिसरामध्ये पाण्यात-चिखलामध्ये धर्मानाथचा मृतदेह निपचीत पडला होता. 10-15 जणांचे प्राण वाचविल्याचे समाधान आताही त्याच्या चेहऱ्यावर कायम होते ! 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणाला १५ गावांचा पाठिंबा; कन्नडमध्ये वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर रास्ता रोको

इन्स्टावर ओळख, लग्नाच्या आमिषाने ठेवले संबंध; १७ वर्षीय मुलीनं बाळाला जन्म देताच २० वर्षीय आरोपी फरार, नवी मुंबईतील घटना

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT