crime_wome.jpg
crime_wome.jpg 
पुणे

अंगातील भूत काढण्यासाठी सुनेला मारहाण; नशेचे द्रव्य पाजून केला व्हिडिओ

रवींद्र जगधने

पिंपरी (पुणे) : अंगातील भूत काढण्यासाठी सासरच्या मंडळींनी सुनेला मारहाण केली. तसेच नशा येणारे द्रव्य जबरदस्तीने पाजून अंगात भुत असल्याचा व्हीडिओ काढल्याचा प्रकार चिंचवडमधील गांधी पेठेत घडली. 

या प्रकरणी ३० वर्षीय पीडित महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली दिली. त्यानुसार, पती परवेश शहा, सासरे बाबूमिया शहा, दिर शबाब शहा, तसेच सासू, जाऊ व मोठी नणंद यांच्याविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पतीसह राहण्यास होती. त्यांच्यासोबत सासू-सासरे, दिर, जाऊ हे देखील राहण्यास होते. तर नणंद मुंबईमधून चिंचवड येथे आली होती. या सर्वांनी मिळवून अंधश्रद्धेपोटी अंगातील भूत काढण्यासाठी सुनेला मारहाण करत तिला नशा येणारे द्रव्य जबरदस्तीने पाजले. त्याचा त्यांनी व्हिडिओ देखील तयार केला. तीची माहेरची परिस्थिती गरीब असतानाही सासरच्यांनी वारंवार पैसे घेतले. तसेच शारीरिक आणि मानसिक छळ करत क्रुर वागणूक दिले. असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

OYO IPO: लवकरच येणार ओयोचा आयपीओ; सेबीकडे पुन्हा कागदपत्र जमा करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT