lonvala.jpg
lonvala.jpg 
पुणे

भरधाव टेम्पो उलटल्याने तीन दुचाकींचे नुकसान 

सकाळवृत्तसेवा

पुणे : भरधाव वेगातील टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकींवर उलटला. या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र, तीन दुचाकींचे मोठे नुकसान झाले. शनिवारी (ता.8) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावर बोरघाटात खंडाळ्यानजीक हा अपघात झाला. 

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरघाटात रस्त्यालगत दुचाकी उभ्या करून काही तरुण-तरुणी दरीचे विहंगम दृष्य पाहत होते. त्याचवेळी अंडा पॉइंटजवळील तीव्र वळण व उतारावरून भरधाव येणाऱ्या आयशर टेम्पो (एमएच 20 सीटी 3949) चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो रस्त्यालगतच्या दुचाकींवर उलटला. त्यात टेम्पो चालकास किरकोळ दुखापत झाली, तर दुचाकींचा चक्काचूर झाला. सुदैवाने दुचाकींजवळ कोणीही नव्हते, त्यामुळे जीवितहानी टळली. आयआरबी कंपनी व महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त टेम्पो बाजूला केला. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरू - गुजरात येणार आमने-सामने; स्पर्धेतील आव्हान टिकवण्याचं दोन्ही संघांसमोर आव्हान

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT