Supriya Sule sakal
पुणे

Supriya Sule : समन्वय नसल्याने नागरिकांना अतिवृष्टीचा फटका;खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप ,तात्काळ मदत पुरवण्याची सरकारकडे मागणी

धरणातून सोडण्यात आलेले‌ पाण्याचे प्रमाण, त्याच्या वेळा आणि नदीकाठच्या नागरिकांना सूचित करण्याची खबरदारी यामध्ये जलसंपदा विभाग आणि महापालिका प्रशासनाकडून कमालीची हेळसांड झाली.

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : धरणातून सोडण्यात आलेले‌ पाण्याचे प्रमाण, त्याच्या वेळा आणि नदीकाठच्या नागरिकांना सूचित करण्याची खबरदारी यामध्ये जलसंपदा विभाग आणि महापालिका प्रशासनाकडून कमालीची हेळसांड झाली. परिणामी गुरुवार, दि.२५ जुलै रोजी रोजीच्या पावसात नदीकाठच्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला असून बाधित कुटूंबियांना सरकारने तातडीने मदत पुरवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वारजे तपोधाम सोसायटी, स्मशानभूमी, शिवणे पंढरीनाथ नगर, इंगळे कॉलनी, उत्तमनगर परिसरातील इंदिरा वसाहत, मासे आळी, कृष्णा रेसिडेन्सी अतिवृष्टी मुळे झालेल्या परिस्थितीची खासदार सुळे यांनी शुक्रवारी रात्री पाहणी केली. घटनास्थळी जाऊन आपदग्रस्त नागरिकांना भेटून‌ त्यांचे मनाने ऐकून घेतले. यावेळी त्यांच्या समावेत काका चव्हाण, सुरेश गुजर, सचिन दोडके, अतुल दांगट, त्रिंबक मोकाशी, अनिता इंगळे,‌ प्रशांत लांडगे, स्वप्निल दुधाने, सचिन बराटे, विकास दांगट, खुशाल करंजावणे, संजय दोडके, वारजे, कर्वेनगरचे सहायक आयुक्त विजय नायकल यांच्यासह अनेक कार्यकर्ते पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

ही बाब लक्षात येताच खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून तातडीने पुण्यात येऊन आज दुपारी या भागातील नागरिकांची भेट घेत त्यांना दिलासा दिला. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेत सरकारने या अडचणीच्या काळात कसलेही राजकारण न करता नागरिकांना तातडीची मदत करावी, अशी मागणी केली.

  • -खंडित झालेला वीज पुरवठा तातडीने पूर्ववत करण्याबची मागणी

  • -नागरिकांना एक महिन्याचे धान्य, कपडे आणि अन्य जीवनावश्यक वस्तू द्या

  • -सर्वसामान्य नागरिकांनीही नागरिकांना मदतीसाठी पुढे यावे,

  • -बाधित नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या मदतीवर देखरेख ठेवावी

  • -संकटकाळात मदत देण्यासाठी छावणी(कँप)ची उभारणी करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

Pune Overhead Cable Action: अनधिकृत ओव्हरहेड केबलवर महापालिकेची धडक कारवाई कायम; इंटरनेट बंद पडल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरदारांची तारांबळ

GT vs RR Live : वैभव सूर्यवंशीची विक्रमी कामगिरी! यशस्वी जैस्वालसोबत मोडला सेहवाग-गंभीरचा विक्रम, रिषभ पंतवरही केली कुरघोडी

Pune News: शाळेतील फी वाढ अन्यायकारक! पुण्यात पालकांचं आंदोलन; मनसेच्या आंदोलकांनी केली पैशांची उधळण

Latest Marathi News Live Update : जय पवार यांनी बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी

SCROLL FOR NEXT