DR.DABHOLKAR SAKAL
पुणे

...या अज्ञानामुळे देशात कृषी संकटापेक्षा ज्ञानाचे संकट मोठे

ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ; डॉ. दाभोळकरांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान

सकाळ वृत्तसेवा

पुणेः मूलतत्ववाद्यांचा सामना विवेकवाद नेहमी करत आला आहे. त्याही पेक्षा सध्याच्या काळात स्वतःला आणि लोकशाहीला जीवंत ठेवण्याचे मोठे आव्हान विवेकवाद्यांसमोर आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी व्यक्त केले.

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे साईनाथ यांचे ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये ‘भारतीय लोकशाही आणि विवेकवादी शक्तींसमोरी आव्हाने’ या विषयावर त्यांनी विचार मांडले. कट्टरवादी शक्तींनी जरी डॉ. दाभोळकरांना शरिररूपाने मारले असले तरी विचारांच्या जागरातून ते आपल्यात जिवंत आहे. त्यांच्या मृत्यूनंतरही विरोधकांना डॉ. दाभोळकरांची भिती वाटते, अशी भावना साईनाथ यांनी व्यक्त केली.

जुने-नवे, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरूष समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन आम्ही लोक परिवर्तनाचे काम पुढे नेत आहे.’’ देशातील विवेकवादी आणि पुरोगामी संघटनांनी डॉ. दाभोलकरांचा स्मृतिदीन हा राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे कडलासकर यांनी यावेळी सांगितले.

कृषीसंकटापेक्षा ज्ञानाचे संकट मोठे

देशाचे प्रधानमंत्री प्लास्टिक सर्जरीद्वारे श्री गणेशाचे तोंड बसविल्याचे म्हणतात. तर दुसरीकडे त्रिपुराचे मुख्यमंत्री नऊ हजार वर्षापुर्वी इंटरनेट अस्तित्वात असल्याचे विधान करतात. अशा अंधश्रद्धा वाढिस लागणाऱ्या या अज्ञानामुळे देशात कृषी संकटापेक्षा ज्ञानाचे संकट मोठे आहे, असे मत पी.साईनाथ यांनी व्यक्त केले. भाजपविरोधात विशाल राजकीय आघाडी उघडूनही काही मोठे बदल होणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

साईनाथ यांनी सांगितलेली आव्हाणे :

१) समाजातिल आर्थिक व सामाजिक असमानता आणि अन्याय

२) असमानता आणि अण्यायाची वाहक असलेली भांडवलशाही शक्ती

३) वाढत चाललेला धार्मिक मुलतत्ववाद

४) धर्म, जाती, प्रांतातील वाढता भेद

५) मूलतत्ववादातून वाढणारा जातीवाद

६) मनुस्मृतीच्या माध्यमातून संविधानाचे पतन

७) भांडवलाशाहीची गुलाम झालेली माध्यमे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Live Updates Marathi: जंतरमंतरवर पोलिसांचा पुन्हा लाठीचार्ज

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

CJP Protest: राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला जे.पी. नड्डांचं उत्तर; काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील पेपरफुटीचा वाचला पाढा

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT