dumper caught fire due to short circuit near khadakwasla dam pune Sakal
पुणे

Khadakwasla News : शॉर्टसर्किटमुळे डंपरला‌ आग; खडकवासला धरणाच्या कोपरा कोठी जवळीस घटना

माती घेऊन निघालेल्या डंपरला आज बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. ही घटना वारजे बहुली रस्त्यावर खडकवासला धरणाच्या कोपरा कोठी जवळ घडली आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुमारे पाऊण तास बंद होती.

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : माती घेऊन निघालेल्या डंपरला आज बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. ही घटना वारजे बहुली रस्त्यावर खडकवासला धरणाच्या कोपरा कोठी जवळ घडली आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुमारे पाऊण तास बंद होती.

पीएमआरडीए’ च्या अग्निशामक दलात वतीने दिलेल्या माहितीनुसार, वारजे येथून माती घेऊन डंपर MH13-CU5694 हा कुठे गावाच्या दिशेने जात होता. यावेळी खडकवासला फाटा सोडल्यानंतर गाडी चालू असताना डंपरच्या केबिन मधील वायरिंग शॉर्ट सर्किट होऊन आग लागली.

अशी माहिती डंपर चालक गोविंद चौरे यांनी दिली. या घटनेच्या वेळी चालत एकटा डंपरमध्ये होता. आग लागल्याचे समजताच त्याने डंपर बाजूला घेऊन चालक गाडीतून खाली उतरला. डंपरला आग लागल्यामुळे दोन्ही बाजूची वाहने मागे सुरक्षित अंतरावर थांबली होती. ही वाहतूक सुमारे पाऊण तास बंद होती.

या आगीमध्ये डंपरचे केबिन पूर्ण जळाले असून त्याचे पुढील टायर तसेच डिझेलची टाकी देतील सुरक्षित आहे. नागरिकांनी माहिती कळविताच पी एम आर डी ए चा अग्निशामक घटनास्थळी पोहोचला त्यावेळी आग ही डंपरच्या चाकाच्या टायर पर्यंत आली होती.

आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर कुलिंग केल्यानंतर वाहतूक सुरळीत केली.अशी माहिती नांदेड सिटीतील अग्निशामक चे फायरमन श्रीकांत आढाव यांनी सांगितले. त्यांच्यासोबत अक्षय तांबे, प्रतीक क्षीरसाट होते. त्याचबरोबर महापालिकेचा सनसिटी येथील अग्निशामक दल देखील घटनास्थळी पोहोचले होते. उत्तमनगरचे पोलीस देखील घटनास्थळी पोचले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT