डंपर कारवाईनंतर खंडणीचा तगादा
पती-पत्नीला जीवे मारण्याची धमकी; दोन तोळ्यांचे लॉकेट लुटले
पाथर्डी ता. १६ ः वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई केल्याच्या राग धरून सहायक मोटार वाहन निरीक्षक महिलेच्या पतीला अडीच लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच पत्नीची नोकरी घालवण्याची व पती पत्नीला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर चाकू व गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून पतीच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे लॉकेट चोरून नेले. याप्रकरणी राहुल रामदास गर्जे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सुधीर शिरसाठ, किसन महादेव आव्हाड, भाऊ आरगडे, बबलू कांबळे, राहुल सानप व अनोळखी पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गर्जे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, पत्नी सोनाली हिने २७ मार्च रोजी बोधेगाव येथे विनानंबरच्या ओव्हरलोड डंपरवर कारवाई केली होती. दुसऱ्या दिवशी शिरसाठ व आव्हाड यांनी आपल्याला आमचे नुकसान झाले असल्याने आम्हाला अडीच लाख रुपये द्या, अशी मागणी केली. पैसे न दिल्यास त्रास देण्याची तसेच पत्नीची नोकरी घालविण्याची धमकी दिली होती तर त्यानंतर ३ मे रोजी शिरसाठवाडी रोडवर आपल्याला मारहाण करण्यात येऊन पोलिसांत तक्रार केल्यास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत गावठी पिस्तुलाचा धाक दाखवला. १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री कारने घरी जात असताना आपल्याला विनाक्रमांकाच्या वाहनातून आलेल्या सर्व आरोपींनी अडवत धमकी देत आपल्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे लॉकेट गावठी कट्टा व चाकूचा धाक दाखवून लुटले. पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.