दुर्गा खानावळीतर्फे महिलांचा सन्मान
पिंपोडे बुद्रुक, ता. १४ : वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथील दुर्गा खानावळीतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात कृषी- वैशाली नलवडे (वाठार स्टेशन), आरोग्य- डॉ. नयन निकम. (अंबवडे सं. कोरेगाव), समाजसेवा- तनुजा चव्हाण, (तळिये), क्रीडा- अपूर्वा बल्लाळ (सातारा), कीर्तन- गाथा यादव (सोळशी), हॉटेलिंग- मीरा कर्णवर व रूपाली सूळ. (वडजल), बचत गट- पूजा पवार (वाठार स्टेशन), शिक्षण - माधुरी क्षीरसागर (विखळे) आणि वृक्षसंवर्धन भारती काळोखे (वाठार स्टेशन) या नऊ क्षेत्रांतील महिलांना नवदुर्गा म्हणून गौरवण्यात आले. फेटा, पुष्पगुच्छ, ट्रॉफी आणि गोदरेज पशुखाद्य यांच्याकडून सर्व महिलांना भेटवस्तू देण्यात आली. पुरस्कार वितरण प्रमुख पाहुण्या हर्षाली निंबाळकर, (तांदूळवाडी, अकलूज) यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच जिल्हा परिषद सदस्या जयश्री भोसले यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. या वेळी कोरेगावच्या पोलिस उपअधीक्षक राजश्री तेरणी यांचाही सत्कार करण्यात आला. रात्री जागृती महिला मंडळ (सातारा) यांच्या वतीने मंगळागौर आणि राजेंद्र महाराज धोत्रे (कुडाळ) यांचे भारुड झाले. याप्रसंगी हजारहून अधिक महिलांना मोफत जेवण देण्यात आले. विमल जाधव आणि दुर्गा जाधव यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सरपंच सीमा चव्हाण यांनी आभार मानले. विजया काळोखे यांनी सूत्रसंचालन केले.
01644
वाठार स्टेशन ः बालकीर्तनकार गाथा जाधव हिचा सन्मान करताना हर्षाली निंबाळकर, समवेत विमल जाधव. (राहुल लेंभे ः सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.