पुणे

‘रायरेश्वर’, ‘रोहिडेश्वर’वर दुर्गपूजन

CD

भोर, ता. २४ ः येथील शिवाजी ट्रेल संस्थेच्या वतीने तालुक्यातील रायरेश्वर, रोहिडेश्वर (विचित्रगड) आणि कावळागड या किल्ल्यांवर दुर्गपूजा करण्यात आली. किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि विकासासाठी शिवाजी ट्रेल संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात. रविवारी (ता. २२) १४५ किल्ल्यांवर हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती शिवाजी ट्रेल संस्थेचे चंद्रकांत पारवे यांनी दिली. रोहिडेश्वर किल्ल्यावर पाटण (सातारा) येथील दिव्यांग तरुणी निशा मगर हिच्या हस्ते दुर्गपूजा करण्यात आली. तिच्यासोबत दुर्गपूजेसाठी अनंत भागवत, सुजित मांजरे व अमोल दरेकर उपस्थित होते. तर रायरेश्वर किल्ल्यावर पुणे महापालिकेचे क्रीडा अधिकारी कपिल राऊत, महापालिकेचे शालेय निवड समिती सदस्य सुनिल सुपनर, दौंड रेल्वेचे तांत्रिक सल्लागार अरविंद नेवसे आणि महापालिकेचे मुख्य स्वास्थ अधिकारी ऋतुराज ममगाई यांच्या हस्ते दुर्गपूजन करण्यात आले. रायरेश्वर किल्ल्याजवळ असलेल्या कावळागडावर विनित नारायण वाघ यांच्यासह संस्थेच्या सदस्यांनी दुर्गपूजन केले.
रविवारी सकाळी किल्ल्यावर पोहोचल्यानंतर सर्व सदस्यांनी प्रथम मंदिराच्या परिसराची स्वच्छता केली. मंदिराच्या परिसरातील कचरा, प्लास्टिक आणि पर्यटकांनी खराब केलेला परिसर साफ केला. त्यानंतर विधीव्रत दुर्गपूजन केले. याशिवाय पर्यटकांमध्ये किल्ल्याच्या संवर्धनाबाबत आणि स्वच्छतेसाठी जनजागृती केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

Sangli Accused :पलूसमध्ये फसवणूक प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; चारचाकी व शेअर मार्केट घोटाळ्यात दोघे ताब्यात

Illegal Cattle : कुपवाडमध्ये कत्तलीसाठी जनावरांची अमानुष वाहतूक; पोलिसांची धडक कारवाई, पाच जणांवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या वणीत आलिशान दुमजली घरात बनावटी दारू कारखाना,राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड

मी खचले होते... 'कमळी' मधील अन्नपूर्णा आजींवर एका कारणामुळे झालेली टीका; म्हणाल्या, 'माझ्यात कमी...'

SCROLL FOR NEXT