Ajit Pawar 
पुणे

Ajit Pawar: कार्यक्रमात 'एकच वादा अजितदादा'ची घोषणा, पवारांनी आपल्या स्टाईलमध्ये घेतली कार्यकर्त्यांची फिरकी

Ajit Pawar In Baramati News: बारामतीमध्ये अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त झाडं वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांचीच फिरकी घेतली.

कार्तिक पुजारी

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या मिश्किल वक्तव्यांसाठी ओळखले जातात. बारामतीच्या कार्यक्रमात त्याचीच प्रचिती पुन्हा आली. बारामतीमध्ये अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त झाडं वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांचीच फिरकी घेतली.

अजित पवार भाषण करत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. 'एकच वादा अजितदादा' अशी घोषणा कार्यकर्ते करत होते. कार्यकर्ते घोषणा करत असल्याने अजित पवारांनी भाषण थांबवलं. जेव्हा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी थांबवली, तेव्हा दादांनी कार्यकर्त्यांनी फिरकी घेतली. हा वादा लोकसभेला कुठे गेला होता काय माहिती, अशी टिप्पणी त्यांनी केली.

अजित पवारांच्या या टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अजित पवार देखील खळखळून हसले. लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार महायुतीसोबत लढते होते. अजित पवारांनी चार उमेदवार उभे केले होते. पण, त्यातील एकच म्हणजे सुनील तटकरे यांनाच विजय मिळवता आला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आपल्या स्टाईलमध्ये कार्यकर्त्यांची थट्टा केली.

अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक कुटुंब, एक झाड संकल्पना राबवण्यात आली. यावेळी अजित पवारांनी कुटुंबांना एका रोपट्याचे वाटप केले. कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी विविध विषयावर भाष्य केलं. तसेच लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर टीका देखील केली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयार सुरु केली आहे. नेत्यांनी विविध जिल्ह्यांचा दौरा सुरु केला आहे. याशिवाय, सरकारने योजनांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवर भर दिला आहे. या योजनेबाबत विरोधकांकडून शंका उपस्थित केली जात आहे. यावर अजित पवार म्हणालेत की, 'काहीही झालं तरी ही योजना बंद पडणार नाही, हा दादाचा वादा आहे'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईचे कुणाल शाह व्हॉट्सअ‍ॅपचे बॉस बनणार! ग्लोबल हेडपदी नियुक्ती; मेटाचा मोठा निर्णय, वाचा शाह नेमके आहेत कोण?

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

Pune BRT : पुण्यातून बीआरटी होणार हद्दपार; महापालिकेच्या मुख्यसभेत निर्णय, आषाढी वारीच्या पूर्वी रस्ते मोठे करणार

Nagpur Crime : मदरश्‍यातील विद्यार्थ्याशी गैरवर्तन; २६ वर्षीय युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Parli Vaijnath News : लांबलेला पाऊस, पडणारे कडक ऊन व मोठ्या तापमानामुळे बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेच्या वेळात बदल

SCROLL FOR NEXT